सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्या "आईची प्रतिमा " या प्रातिनिधिक काव्य संग्रहाचे २४ डिसेंबर २०२३ रोजी हडपसर,पुणे येथे जल्लोषात प्रकाशन.
कवयित्री सौ.प्रतिमा अरुण काळे यांच्या "आईची प्रतिमा" या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे,काळे पडळ,हडपसर,पुणे येथे अखंडित कल्याणकारी काव्य समुह साहित्य संमेलन-२०२३ मध्ये प्रकाशन झाले.
रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी समुहाचे संस्थापक प्रा.कल्याण राऊत,लातूर.संमेलानाध्यक्ष मा. सुधाकर झिंगाडे,उमरगा,कवी संमेलनाध्यक्ष ह.भ.प.पुरुषोत्तम हिंगणकर अकोला,प्रमुख पाहुणे प्रा. शरदचंद्र काकडे,देशमुख,पुणे.मा. मारोती(आबा)तुपे, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यसंमेलन संपन्न झाले.या प्रकाशन प्रसंगी लक्ष्मण शिंदे सर,धनंजय इंगळे सर,अशोक सोनवणे सर,प्रमोद सुर्यवंशी,योगिता कोठेकर,दशरथ धायगुडे,योगेश हरणे,गौरव पुंडे,तसेच महाराष्ट्रातून विविध ठिकाणाहून आलेले साहित्यिक आवर्जून उपस्थित होते.
सौ.प्रतिमा काळे यांच्या आईचे २ जानेवारी २०२४ रोजी वर्ष श्राद्ध आहे..त्या निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साहित्यिक मित्र,मैत्रिणीच्या आई विषयावरील कवितांचे प्रातिनिधिक काव्य संग्रह बनवला.त्यास प्रसिद्ध साहित्यिक,योगा शिक्षक,निवेदक,अभ्यासक,तज्ञ मार्गदर्शक मा.हेमंत सामंत सरांची प्रस्तावना,मा.मधुसूदन घाणेकर सर यांच्या शुभेच्छा,मा.विजय वडेवराव सर यांचा अभिप्राय लाभला.यात ७८ कवी-कवयित्री यांच्या आई विषयावरील कविता आहेत.सर्वांनी हा काव्यसंग्रह वाचावा अशाच कविता या संग्रहात आहेत.
stay connected