अनाठायी खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा

 *अनाठायी खर्च न करता विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून केला वाढदिवस साजरा..*

----------------------------------------

*वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते अविनाश जाधव यांचा स्तुत्य उपक्रम..*

----------------------------------------



आष्टी/ प्रतिनिधी

सध्या वाढदिवस म्हणाले की,मोठा कर्कश आवाज येणारा डिजे,त्या डिजेच्या तालावर ठेका धरणारे मित्र परिवार किंवा गौतमी पाटील सारखी एखादी नृत्यांगणेला आमंत्रित करणे,किंवा त्याही पलिकडे जाऊन हॉटेलात मित्र कंपनीला पार्टी देणे असा सध्या स्ट्रेड नवयुवकांमध्ये दिसून येत आहे.


परंतु कडा शहरातील शांत,संयमी,व हूशार नेतृत्व असणारे अविनाश ऊर्फ सोनू जाधव याचा काल दिनांक २५ डिसेंबर रोजी वाढदिवस होता.

कुठलाही अनाठायी खर्च न करता आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने त्यांंनी साजरा केला.

देशाचे भविष्य घडवणारे कोण असतील तर ते आहेत विद्यार्थी.

म्हणून पहीली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अविनाश जाधव यांनी शालेय साहित्याचे वाटप करून अगदी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.

यावेळी सोनु जाधव यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितले की, माझ्या वाढदिवसानिमित्त मी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची भेट देऊन एक छोटासा प्रयत्न केला आहे.

परंतु विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावरील जो आनंद मला पाहायला मिळाला तो आनंद माझ्यासाठी खुप मोठा होता.

मी माझ्या वाढदिवसानिमित्त नवयुवकांना सांगू इच्छितो की,आपल्या वाढदिवसाला व्यतिरिक्त खर्च न करता आपण सर्वांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप किंवा गणवेश वाटप अशा प्रकारच्या भेट देण्याचा प्रयत्न करावा.असा संदेशही अविनाश जाधव यांनी तरूणांना दिला आहे.

अविनाश जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, राजकिय,शैक्षणीक स्तरांतून त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करुन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा ही देण्यात आल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.