देशातील हिंदूना एकत्र आणण्यासाठी संघाला Prakash Ambedkar यांचा सल्ला

 देशातील हिंदूना एकत्र आणण्यासाठी संघाला Prakash Ambedkar  यांचा सल्ला





राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमध्ये येऊन वंचित बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी देशातील हिंदूना एकत्र आणण्यासाठी संघाला सल्ला दिला आहे.

नागपूरमध्ये आयोजित स्त्री मुक्ती परिषदेत बोलताना आंबेडकर म्हणाले ‘जर देशातील हिंदुना एकत्र आणायचे असेच तर संघाला एक काम करण्याचा मी सल्ला देतो. संघाने देशात हिंदू धर्मशास्त्र विद्यापीठाची स्थापना करावी आणि एक कायदा बनवून देशातील प्रत्येक मंदिरातील पुजारी या विद्यापीठातून पदवीधर असावा हा कायदा तयार करावा. पुजारी हा मग कुठल्याही जातीचा असो चालेल. हिंदुना एकत्रित करण्यासाठी संघाने माझा हा सल्ला मानावा.सरसंघचालक मोहन भागवत यांनाही त्यांच्या भूमीत प्रकाश आंबेडकरांनी सवाल केला. मोदी आमच्या प्रश्नांना उत्तर देत नाही, किमान मोहन भागवतांनी तरी देतील अशी अपेक्षा करतो, असे आंबेडकर म्हणाले. पुलवामा हल्ल्यात भारताच्या सैनिकांनी जीव गमावला. मोदी याबाबत उत्तर द्यायला तयार नाही, किमान मोहन भागवत यांनी याबाबत उत्तर द्यावेे. साधारणत: सैनिकांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसतात. मात्र पुलवामा घटनेदरम्यान ८० वाहनांचा ताफा होता. सैनिकांच्या सुरक्षेसाठी दहा वाहनापर्यंत रेंज असणारे शस्त्र असतात, मात्र पुलवामा दरम्यान हे शस्त्र नव्हते. मोहन भागवत यांनी या गोष्टींचा खुलासा करावा, अशी मागणी आंबेडकरांनी केली.देशात मनुवादी व्यवस्था पुन्हा येऊ द्यायची नसेल तर संसदेवर आपल्या विचारांचा ताबा मिळविणे आवश्यक आहे. मोदीला संपविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने ५०० मतदार गोळा करण्याची जबाबदारी स्वीकारावी. यासाठी कुणाशी मैत्री करावी लागेल, प्रसंगी मत विकत घ्यावे लागेत तर ते घ्या, असा सल्ला आंबेडकर यांनी दिला. मनुची व्यवस्था ही अन्यायकारक आहे. त्यामुळे याविरोधात २०२४ मध्ये लढा उभारणे गरजेचा आहे, असेही आंबेडकर म्हणाले.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.