तब्बल ४१ वर्षांनी एकत्र येऊन केला स्नेह मिलन सोहळा
---------------------------------------
आष्टी तालुक्यातील कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालयात १९८२ पुर्विचे मित्र मैत्रिणी एकत्र येऊन कडा येथील प्रविण मंगल कार्यालयात स्नेह मिलन सोहळा पार पडला.
--------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
इयत्ता दहावी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्वाचा टप्पा. या टप्प्यानंतर प्रत्येकजण आपापल्या योग्यतेनुसार, आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो. असा हा टप्पा ओलांडून आज मला ४१ वर्षे झाली, अर्थातच ते साल होते १९८२.मोतीलाल कोठारी विद्यालय इथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांशी मित्र, मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले. करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं. पण व्हॉट्सॲप आणि फेसबुकने आमच्या मैत्रीचा पुर्नजन्म घडवला.
आमच्या दहावीच्या १९८२ च्या सर्व तुकड्याच गेट टुगेदर आज २७ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
त्याचबरोबर दरवर्षी आम्ही सर्व मित्र मैत्रीणी एकत्र येऊन अशाच प्रकारे गेट टुगेदर चा कार्यक्रम करत जावू.
अशी महीती संतोष शिंगवी यांनी दिली आहे.
यावेळी संतोष शिंगवी,हिंमत मुळीक, संतोष पटवा, भिमराव कुर्हाडे,गोरख कर्डिले,अल्पना भंडारी,मिनाक्षी पाटील,सुरेखा देशमुख, ज्योती भंडारी, सतिष मुनोत, शिवाजी कर्डिले सह सर्व मान्यवर उपस्थित होते.
stay connected