साबलखेड जवळ दुचाकी अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
अहमदनगर केडगाव येथील रुषीकेष धर्माधिकारी हा युवक त्याच्या दुचाकीवरून नगरकडे जात असताना पल्सर दुचाकी गाडी स्लिप होऊन झालेल्या अपघातात तो जागीच ठार झाला . हा अपघात दि ९ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला . साबलखेड ते आष्टी दरम्यान गेल्या सात महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरु आहे . हे काम अत्यंत धिम्या गतीने चालू असून यामुळे अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत . साबलखेड ते कडा दरम्यान एका बाजूने सिमेंट रस्ता झाला आहे . या ठिकाणी सिमेंट रस्त्यावर पाणी मारण्या साठी पोते ओले करण्यात आलेले आहेत . सिमेंट रस्त्यावर गाडी घसरून दुरवर फरफटत गेल्याने रुषीकेष धर्माधिकारी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला . या घटनेने पुन्हा एकदा रस्त्याच्या कामाला गती मिळावी हा प्रश्न ऐरणीवर आला आहे .
stay connected