मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेस गाडीत नाविन्यपूर्ण योजना राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करत आहे

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेस गाडीत नाविन्यपूर्ण योजना राबविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करत आहे





मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी वंदे भारत एक्स्प्रेसच्या डब्यांमधील चलन आव्हानांना सामोरे जाण्याच्या उद्देशाने दोन महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत.


• एक्झिक्युटिव्ह कोचमधील शौचालयांसाठी  गंध सेन्सर्सची अंमलबजावणी:

स्वच्छतेच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या समस्यांना तत्काळ प्रतिसाद देण्याच्या हेतूने एक सक्रिय पाऊल म्हणून, मध्य रेल्वेने वंदे भारत एक्स्प्रेसच्या एक्झिक्युटिव्ह कोचच्या शौचालयांमध्ये गंध सेन्सर्स सुरू केले आहेत. हे सेन्सर्स चाचणीच्या आधारावर तैनात केलेले आहेत आणि शौचालयाच्या वातावरणातील सततच्या गंध पातळीचे परिक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. वासाच्या तीव्रतेत वाढ झाल्याचे आढळून आल्यावर, सेन्सर्स हाऊसकीपिंग कर्मचार्‍यांना इशारा संदेश त्वरीत पाठवतो.


हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान कर्मचाऱ्यांना कोणत्याही माहिती प्राप्त झालेल्या भागात त्वरित उपस्थित राहण्यासाठी याची मदत होते, स्वच्छता मानके सुस्थितीत राखण्यासाठी आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी ही योजना जलद कारवाई होण्याची सुनिश्चित करते. चाचणीच्या यशस्वी कालावधीनंतर, हे गंध सेन्सर्स इतर सर्व गाड्यांच्या डब्यांमध्ये हळूहळू बसविण्यात येणार आहेत, ज्यामुळे संपूर्ण ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वच्छ व सुखकर प्रवासासाठी मदत होईल.


• वंदे भारत कोचमध्ये कंप्रेस पाईप ओरिएंटेशनमध्ये बदल:

वंदे भारत गाड्यांच्या ड्रायव्हिंग ट्रेलर कोचच्या (DTC) मुख्य जल मार्गिकेतून ते ऑटो ड्रेन व्हॉल्व्हपर्यंत कंप्रेस पाईपवर परिणाम करणाऱ्या घटनांशी संबंधित वारंवार येणारे आव्हाने लक्षात घेता, मध्य रेल्वेने एक महत्त्वपूर्ण बदल सुरू केला आहे. अशा घटनांदरम्यान होणार्‍या नुकसानीच्या असंरक्षितता लक्षात घेऊन, कंप्रेस पाईपचे दिशानिर्देश एका डीटीसी कोचमध्ये उलट बसविण्यात आले आहे.


या धोरणात्मक बदलाचे उद्दिष्ट ऑटो ड्रेन व्हॉल्व्ह आणि कनेक्टिव्ह पाईपचे रक्षण करणे असून, ज्यामुळे नुकसान कमी होते आणि आव्हानात्मक परिस्थितीतही सुरळीत चलन सुनिश्चित होते. या सुधारित उपाययोजनेची प्रभावीकता सध्या सूक्ष्म निरीक्षणाखाली असून,  यशस्वी प्रमाणानंतरच, हा बदल वंदे भारत एक्स्प्रेस मधील इतर डीटीसी कोचमध्ये वाढविला जाईल.


ही उपाययोजना प्रवाशांची संरक्षितता, आरामदायी प्रवास आणि गाडीच्या कार्यक्षमतेसाठीची मध्य रेल्वेची अतूट बांधिलकी अधोरेखित करते. तसेच आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्रिय दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करते, जे वंदे भारत मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव सतत वाढविण्यासाठी तत्पर आहे.


---------





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.