शेवटचा दिस गोड होण्यासाठी आयुष्यभराची कसरत महत्त्वाची - तावरे महाराज
आष्टी प्रतिनिधी
माणसाच्या आयुष्यामध्ये मोक्षप्राप्ती ही शेवटची परीक्षा आहे.आयुष्यभर माणसाने वेचलेला चांगुलपणा,केलेले सत्कर्म, आई-वडिलांची,लोकांची सेवा,समाजासाठी जोपासलेले हित हे वाया जात नाही, ते त्याच्या शेवटच्या क्षणाला कामी येते आणि ते कामी आणण्यासाठी आयुष्यभर खूप कष्ट घ्यावे लागतात.तेव्हा हे सर्व प्राप्त होतं.... याचसाठी केला अट्टाहास,शेवटचा दिस गोड व्हावा... या ओळी आयुष्यभर माणसाने लक्षात ठेवाव्यात.असे ह.भ.प.तावरे महाराज म्हणाले.मौजे चिंचाळा येथे कै.लक्ष्मण दादा माणिकराव पोकळे यांच्या चौथ्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन कार्यक्रमात ते बोलत होते.या कीर्तनाला गायनाचार्य अशोक भोसले,मृदुंगाचार्य ओम महाराज नन्नवरे, हनुमान महाराज खेडकर यांची उपस्थिती उल्लेखनीय होती.यावेळी भूमिपुत्र प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांनी लक्ष्मण दादांच्या आठवणी जागवल्या.ते म्हणाले,दादा चालते बोलते मार्गदर्शक होते.लेझीम सारख्या खेळात सुद्धा लहान मुलांना प्रोत्साहन देत.उत्साह वाढविण्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांचे चिरंजीव फौजी नवनाथ पोकळे हे दरवर्षी त्यांचे पुण्यस्मरण जागवून अन्नदान करतात,ही फार मोठी गोष्ट आहे.यावेळी ह.भ.प.तावरे महाराज यांच्यासोबत 25 सहकार्यांनी सहभाग घेतला.या कार्यक्रमाला पोलीस पाटील गणपत पोकळे,आत्माराम पोकळे,सरपंच पंडित कल्याण पोकळे,दिगंबर पोकळे,महादेव पोकळे गुरुजी,देवराव पोकळे,रामचंद्र बापू पोकळे,सुनील पोकळे,नवनाथ साळुंखे,जालिंदर पोकळे,माजी सरपंच शिवाजी साळुंखे,तथा परिवारातील रामांना पोकळे,बाळू पोकळे, एकनाथ पोकळे,मधुकर पोकळे,बाळू सोमीनाथ पोकळे,शिवा पोकळे,अशोक पोकळे,एकनाथ पोकळे,सिद्धांत पोकळे,यांच्यासह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्तांनी,माता भगिनींनी पुण्यस्मरण सोहळ्यात सहभाग घेतला होता.
stay connected