मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करण यादव यांनी मनमाड - दौंड आणि पुणतांबा - साईनगर शिर्डी विभागाची व्यापक पाहणी केली

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री राम करण यादव यांनी मनमाड - दौंड  आणि पुणतांबा - साईनगर शिर्डी विभागाची व्यापक पाहणी केली








श्री राम करण यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी ०९ डिसेंबर २०२३ रोजी मनमाड - दौंड  आणि पुणतांबा - साईनगर शिर्डी विभागाची व्यापक तपासणी केली. या दोन्ही विभागातील विविध ठिकाणी प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधा आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेच्या मूल्यांकनावर या तपासणीत लक्ष केंद्रित करण्यात आले.


आपल्या भेटीदरम्यान, श्री यादव यांनी मनमाड - दौंड  आणि पुणतांबा - साईनगर शिर्डी दरम्यानच्या विंडो ट्रेलिंग तपासणीपासून सुरुवात करून महत्त्वाच्या क्षेत्रांची काळजीपूर्वक तपासणी केली. येथे त्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाचे मूल्यमापन केले आणि एक निर्बाध आणि आरामदायी प्रवास अनुभव सुनिश्चित करण्याची वचनबद्धता अधोरेखित केली.


साईनगर शिर्डी स्थानकावरील सखोल तपासणी सुरू राहिली, जिथे श्री यादव यांनी, स्टेशन डेव्हलोपमेंट, प्रवासी सुविधा आणि सेवेच्या दर्जाच्या महत्त्वावर भर दिला. प्रवासी सेवा वाढविण्याच्या रेल्वेच्या वचनबद्धतेचे प्रदर्शन करून ज्यात तपासणीमध्ये स्टेशन डेव्हलोपमेंट, बुकिंग ऑफिस, एटीव्हीएम, अपग्रेडेड एसी वेटिंग रूम्स, स्टेशनची स्वच्छता, वन स्टेशन वन प्रोडक्ट स्टोअर्स, लेडीज टॉयलेट, न्यू एफओबी आणि स्टेशनचे सर्कऊलाटींग कक्षेत्राचे  समाविष्ट होते.


श्री यादव यांनी पुणतांबा जंकशन स्थानकात, जेथे त्यांनी तपासणीमध्ये क्रू लॉबी, रनिंग रूम आणि जेवणाची गुणवत्ता देखील बारकाईने पाहणी केली. 


अहमदनगर स्टेशनवर तपासणी सुरू राहिली, जिथे श्री यादव यांनी प्रवासी सेवा सुधारण्यास प्राधान्य दिले आणि अमृत भारत स्टेशन योजनेच्या प्रगतीचे बारकाईने निरीक्षण केले. अमृत स्टेशन योजनेबाबत त्यांनी DRM श्री नीरज कुमार डोहारे आणि  & Sr. DEN (Co) यांच्या सोबत बारकी ने पाहणी केली ज्यात नवीन बुकिंग ऑफिस, पार्किंग सेवा आणि नवीन सार्कउलटींग एरिया चा समावेश होता. 


त्यानंतर, जीएम, श्री रामकरण यादव यांनी अहमदनगर स्थानकावरून प्रस्थान केले आणि मनमाड - दौंड विभागाची सर्वंकष, विंडो त्ट्रैलिंग पाहणी केली, जिथे त्यांनी मनमाड - दौंड विभागाच्या दुहेरी लाईन, प्रगतीची पाहणी केली.


सुरक्षित, विश्वासार्ह आणि आधुनिक वाहतूक सेवा देण्याच्या आपल्या ध्येयात मध्य रेल्वे स्थिर आहे. या तपासणीचे निष्कर्ष धोरणात्मक सुधारणांना हातभार लावतील, ज्यामुळे उत्कृष्टतेसाठी रेल्वेची वचनबद्धता मजबूत होईल.

—----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.