सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांनी घडविले बालआनंद बाजारचे दर्शन

 *सात्रळच्या रयत शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांनी घडविले बालआनंद बाजारचे दर्शन*



रयत शिक्षण संस्थेचे, नानासाहेब सहादू कडू पाटील विद्यालय व बापूजी सहादू कडू पाटील कनिष्ठ महाविद्यालय सात्रळ येथे स्काऊट खरी कमाई व बालआनंद मेळावा उत्साहात संपन्न झाला.

   याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सात्रळ गावचे उद्योगजक विलासराव चोरमुंगे पाटील यांच्या शुभहस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.

   यावेळी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बडे, पर्यवेक्षिका सुशिला थोरात,प्रा.विलास दिघे उपस्थित होते.

  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागप्रमुख विलास गभाले नियोजन केले तर जेष्ठ शिक्षक त्रिंबक राशीनकर गुरुकुल प्रमुख सच्चिदानंद झावरे,केशव मुसमाडे, सतिश नालकर, प्रकाश कुलथे संजू दिघे,युनूस पठाण,भारत कोहकडे,ज्ञानदेव लेंडे, सुदर्शन गिते, वैभव वसावे, सुमेध शिंदे, देविदास थोरात, शिवदास सातपुते, सुनिता ढोकणे गिताजंली गोसावी, संगिता सांगळे, पल्लवी गावडे, प्रांजली फरकाडे, प्रविणा दिघे, कावेरी वदक,प्रमिला बनगये रत्नाकर सोनवणे, ज्ञानदेव माळी, राजू पेटारे,रामदास साबळे यांनी परिश्रम घेतले.

   रयत शैक्षणिक संकुलात सुमारे १५० ते १६० विद्यार्थ्यांनी बाल आनंद बाजारात व्यवहारिक ज्ञानात भर पडेल असे विविध पालेभाज्या फळे वडापाव,शाबुदाणा खिचडी,पोहे,कचोरी स्नॅक्स,चहाचे स्टॉल मांडून हिशोबाचे धडे गिरवत नफा तोटा काय असतो ही संकल्पना उपस्थित पालकांना व शिक्षकांना सांगत बाल आनंद बाजाराचे दर्शन शाहाण्या माणसांना घडत होते.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.