सांगवी गावचे सरपंच दत्तात्रय खोटे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

 सांगवी गावचे सरपंच  दत्तात्रय खोटे आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित



-----------------------------------

आष्टी/प्रतिनिधी 

तालुक्यातील सांगवी पाटण येथील सरपंच दत्तात्रय दादाराव खोटे यांना सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र, राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, प्रतिसक्षम ग्रामपंचायत, व सन्मानित सरपंच यासाठी कार्यरत असलेल्या सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने ग्रामपंचायतला चांगली दिशा मिळण्यासाठी परिषदेच्या वतीने उत्कृष्ट काम करणारे सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, लोकप्रतिनिधींना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, पद्य श्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्यात काम करत आहे, सांगवी पाटण गावचे सरपंच यांचे काम करण्याची पद्धत गावच्या विकास करण्याची तळमळ पाहता सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करणारे, लहान ते थोरापर्यंत सगळ्या सोबत आपुलकीने वागणारे, मित भाषिक, खोटे सरपंच यांच्या कामाची दखल घेत सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीने खोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर केला आहे, यशदा पुणे येथे ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता खोटे यांना आदर्श सरपंच पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे अशी माहिती सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांनी दिली.. त्यामुळे सरपंच दत्तात्रय दादाराव खोटे यांना सर्व स्तरातून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.









Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.