*जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ यांच्या हस्ते सिंधुबाई औटे यांना आदर्श माता सन्मानपत्र देऊन सन्मानित*
----------------------------------------
आष्टी/ प्रतिनिधी
स्वताच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी माजी सरपंच सौ. सिंधुबाई बबनराव औटे यांनी मुलाला यकृत ( लिव्हर ) दान केले होते. नऊ वर्षांनंतर दोघा माय लेकरांची प्रकृती ठणठणीत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ ( मुंडे ) यांच्या हस्ते १ डिसेंबर २०२३ रोजी सौ . सिंधुबाई बबनराव औटे यांना आदर्श माता सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, याप्रसंगी पती व प्रगतीशील शेतकरी बबनराव औटे, मुलगा संदीप औटे यांची उपस्थिती होती.
याबाबत अधिक माहिती अशी की,
आष्टी तालुक्यातील नांदा येथील माजी सरपंच सौ सिंधुताई बबनराव औटे यांनी आपला शिक्षक असलेला एकुलता एक मुलगा संदीप औटे यांस लिव्हर दान करुन त्यास जिवदान दिले होते. राज्यात अवयव दान चळवळीचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते औटे दाम्पत्याला सन्मानित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ यांनी सन्मानपत्रात म्हटले आहे की,
उभयंतांनी आपले सुपुत्र जे व्यवसायाने प्राथमिक शिक्षक असलेले संदिप औटे हे भयावह व्याधीतून माता सौ. सिंधुताई बबनराव औटे यांनी स्वतःचे यकृत (लिव्हर) दान करुन आपल्या पुत्राचे प्राण वाचवले. भयानक अशा परिस्थितीवर मात करुन आदर्श निर्माण केला. अशा आदर्श माता-पित्यांचा यथोचित सन्मान, बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपाताई मुधोळ ( मुंडे ) मॅडम यांनी सन्मानपत्र देवून गौरव केला. त्याबद्दल औटे दाम्पत्याचे आष्टी तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
stay connected