आदिल ने केला रमजानचा पहिला रोजा पूर्ण
बीड (प्रतिनिधी ) - बीड येथील काझीनगर येथील फारूख जुनेद सिद्दीकी यांचा 6 वर्षाचा मुलगा आदिल फारूख सिद्दीकी याने पवित्र रमजान चा पहिला रोजा पुर्ण केला . यंदा प्रचंड उष्णता असल्याने भल्याभल्यांची तारांबळ उडते मात्र तरीही मुस्लिम बांधव मोठ्या श्रध्देने रमजान चे पवित्र निरंक उपवास (रोजे ) मोठ्या भक्तीभावाने ठेवतात . पहाटे सुर्योदयापूर्वी रोजाची सुरुवात होते तर सायंकाळी सुर्यास्त नंतरच रोजा पूर्ण होतो दरम्यान अन्न पाणी वर्ज असते . आदिल नेही आपल्या आई - बाबांचे अनुकरण करत हा कडक उपवास पुर्ण केला . त्याच्या या सत्कार्याचे कौतुक होत आहे .
stay connected