माजी आ. भीमराव धोंडे यांच्या अध्यक्षतेखाली सिने अभिनेता सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्या उद्घाटन
कडा ( वार्ताहर):- आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिक्षण महर्षी भीमराव धोंडे यांच्या वाढदिवसानिमित्त कडा येथे दिनांक १९ ते २१ जुलै असा तीन दिवसांचा भव्य क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सिने अभिनेता व महाविद्यालययाचा माजी विद्यार्थी सुरेश विश्वकर्मा यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन दिनांक १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार भीमराव धोंडे हे उपस्थित राहणार असुन प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते अजय दादा धोंडे, अभयराजे धोंडे, सिने लेखक संजय नवगिरे, महाराष्ट्र केसरी सईद चाऊस हे उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संयोजक व प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. विधाते यांनी सांगितले की, शेतकरी शिक्षण संस्था, आनंद चॅरिटेबल शिक्षण संस्था, किसान शिक्षण संस्था व छत्रपती शाहू फुले आंबेडकर शिक्षण संस्था या सर्व संस्थेच्या अंतर्गत सर्व माध्यमिक, उच्चमाध्यमिक विद्यालये व महाविद्यालयांच्या सांघिक / वैयक्तिक क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर १९ ते २१ जुलै या कालावधीत या स्पर्धा होणार आहेत.
विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासाबरोबर खेळाचेही ज्ञान मिळावे. खेळातून पुढे जाऊन यशस्वी व्हावे, राज्य आणि देशपातळीवर ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळात यशस्वी व्हावेत यासाठी गेल्या अनेक वर्षापासून अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी संस्थांतर्गत क्रीडा महोत्सवाचे आयोजन आष्टी येथे करण्यात येते परंतु यावर्षी कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयांमध्ये या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थेअंतर्गत सर्व माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय प्राथमिक शाळा या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या आठ दिवसांपासून महाविद्यालयाच्या परिसरात वेगवेगळ्या खेळाची मैदाने बनवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. स्पर्धेत सुमारे ४ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचे संघ असून वैयक्तिक व सांघिक स्पर्धा होणार असून या स्पर्धा पाहणे व आपल्या पाल्यांचे कौतुक पाहण्यासाठी परिसरातील पालक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक प्राचार्य डॉ हरिदास विधाते, प्राचार्य डॉ. अशोक गदादे, प्राचार्य संजय धोंडे, प्राचार्य दादासाहेब काळे, मुख्याध्यापक संजय कोथमिरे यांच्या वतीने करण्यात आले आहे
Vdo पहा👇📽️
stay connected