*मराठी पञकार परीषद बीड जिल्हा प्रसिध्दीप्रमूख पदी जिंतेद्र सिरसाट यांची निवड*
बीड ( प्रतिनीधी)
महाराष्ट्र राज्यातील पञकारांची मातृसंस्था असणारी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या बीड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी येथील युवा संपादक जितेंद्र सिरसाट यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील पञकरांची मातृसंस्था असणारी अखिल भारतीय मराठी पञकार परीषदेच्या वतीने पञकारांचे प्रश्न घेऊन सातत्याने लढा उभारला जातो.पञकर संरक्षण कायद्या प्रश्न मराठी पञकर परीषद व परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमूख यांच्या पाठपूराव्यामुळे मार्गी लागला. मराठी पञकर परीषदेचे उपक्रम देशभरातील सर्व पञकारांपर्यंत व परीषदेच्या सभासदांपर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा निहाय प्रसिध्दीप्रमूख यांची नेमणूक करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा प्रसिध्दी विभाग राज्यात प्रभावीपणे काम करत आहे. बीड जिल्ह्यातही मराठी पत्रकार परिषदेचे विविध उपक्रम व कार्यक्रम प्रत्येक पञकारांपर्यंत पोहचावेत यासाठी नविन जिल्हा प्रसिध्दी प्रमूखांच्या नियूक्त्या करण्यात येत असून मराठी पत्रकार परीषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली युवक तरूण संपादक जिंतेद्र सिरसाट यांची बीड जिल्ह्याच्या प्रसिध्दी प्रमुख पदी नियूक्ती करण्यात येत असून त्यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेचे ध्येय धोरणे व उपक्रम प्रत्येक पञकारांपर्यंत पोहचवण्याचे काम करावे
व अखिल भारतीय मराठी पत्रकार परीषदेच्या मजबूत बांधणीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन राज्य प्रसिध्दीप्रमूख अनिल महाजन यांनी केले आहे.
stay connected