*आमदार सुरेश धस यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट.* *********************** आगामी गळीत हंगामात मजुरांच्या सुविधांबाबत केली चर्चा

 *आमदार सुरेश धस यांनी घेतली साखर आयुक्तांची भेट.*

                                आगामी गळीत हंगामात मजुरांच्या सुविधांबाबत केली चर्चा 

                                                            ************************


आष्टी (प्रतिनिधी)

 बीड,लातूर,उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांनी मंगळवार दि.२४ ऑगस्ट रोजी पुणे येथील साखर संकुलात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेऊन ऊसतोड कामगारांच्या विविध मुद्यावर सविस्तर चर्चा केली.

       राज्य सरकार,कारखानदार व साखर संघ  गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ऊसतोडणी कामगार व वाहतूकदार यांना कोण-कोणत्या सामाजिक सुरक्षा व अयोग्य सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहेत. ऊसतोड कामगारांच्या कल्याणकारी महामंडळाचे अद्याप कोणत्याही प्रकारची हालचाल व अंमलबजावणी सुरू नाही. राज्यसरकार तीन महिन्यांत ऊसतोड मजुरांचा कायदा करणार होते ते अजूनही जैसे थे परिस्थितीत आहे. कायद्याची घोषणा होऊन विधिमंडळाची तीन अधिवेशने या दरम्यान झाली आहेत. तरी देखील अद्याप कायदा होऊ शकला नाही.

         ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्यासाठी मा.उपसभापती निलमताई गोऱ्हे समितीची अंमलबजावणी आरोग्य प्रशासन यांच्याकडून अद्याप होताना दिसत नाही. गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर साखर कारखाना स्थळावर (स्थानिक ठिकाणी) महिलांसाठी आयुर्मंगलम योजनेचा नव्याने प्रारंभ करून त्यांना आरोग्य कवच देण्यात यावे, ऊसतोडणी कामगारांची सरकार सत्तेत येऊन तीन वर्ष होत आले.पण अद्याप ऊसतोडणी मजुरांची नोंदणी व आकडेवारी संकलित करण्यासाठी इतकी दिरंगाई का..? अशा अनेक समस्या मुद्यांवर सविस्तर चर्चा आ.धस आणि साखर आयुक्त यांच्याशी झाली.

           ऊसतोडणी कामगारांना ऊसभरणी करताना जी कसरत करावी लागते ती कमी होण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अभियंता सनी काळभोर याने ऊसवाहतूक वाहनामध्ये भरण्यासाठी एक मशिन बनवली आहे.जी मशिन जवळपास १०० फुटावरून ऊसाची मोळी वाहून ट्रॅक्टर, ट्रक,छकडा गाडी यामध्ये सहजासहजी कमी वेळेत, कमीत कमी कष्टाने   गाडी भरण्यासाठी मदत होते, त्यामुळे महिलांचे गर्भपात, मणक्याचे आजार,हातपायाला इजा होणे इत्यादी धोक्याच्या गोष्टीपासुन ऊसतोड मजुरांना मोकळा श्वास मिळू शकतो, ही मशीन वाहतूकदार ग्रुप मध्ये खरेदी करू शकतो, परंतु अद्याप ह्या मशीनचे पेटंट (अधिकृत नोंदणी) न झाल्याने ते उपयोगात आणता येणार नाही त्यामुळे आपण प्रत्यक्ष अभियंता काळभोर यांनी बनवलेल्या मशिनची पाहणी करून भेट द्यावी त्यांना अधिकृत नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती शेवटी बोलताना आ. धस यांनी साखर आयुक्तांना याभेटी दरम्यान केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.