देवळाली पंचायत समिती गणातून कामाचा माणूस असणाऱ्या आण्णासाहेब शिरसाठ यांना संधी द्यावी - शौकत पठाण यांची मागणी

 देवळाली पंचायत समिती गणातून कामाचा माणूस असणाऱ्या आण्णासाहेब शिरसाठ यांना संधी द्यावी - शौकत पठाण यांची मागणी



  दौलावडगाव प्रतिनिधी -

 सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, राजकीय यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत गावाला विकासाची गंगा आणून परिसरात मोठा जनसंपर्क असुन अल्पावधीत तरूणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या आ.सुरेश आण्णा धस याचे खंदे समर्थक आण्णासाहेब शिरसाठ यांना देवळाली पंचायत समिती गणातून संधी द्यावी अशी मागणी अरणविहरा,तागडखेल ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य शौकत पठाण यांनी केली आहे.

    आष्टी तालुक्यातील अरणविहरा येथील सामाजिक कार्यकर्ते सरपंच पती आण्णासाहेब शिरसाठ याचे गावासह परिसरात मोठे सामाजिक योगदान असून राजकीय, धार्मिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रात ते कार्यरत असतात.आ.सुरेश आण्ण धस याच्या माध्यमातून त्यांनी तरूणाचे मोठे जाळे परिसरात निर्माण केले असून त्याना मानणारा मोठा वर्ग आहे.गावचा कारभार पारदर्शक व स्वच्छ असल्याने भविष्यात होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीत त्यांना सुरेश आण्णा धस यांनी देवळाली पानाची या गणातून लढण्याची संधी द्यावी. त्या संधीचे ते नक्कीच सोनं करतील म्हणून त्याना संधी द्यावी अशी मागणी अरणविहार,तागडखेल ग्रुप ग्रामपंचायत सदस्य शौकत पठाण यांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.