आष्टी मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान घरकुल आवास योजनेत १८ हजार घरकुले मंजूर

 आष्टी मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान घरकुल आवास योजनेत १८ हजार घरकुले मंजूर  


******************************



*****************************

आष्टी,पाटोदा,शिरूर कासार या तिन्ही तालुक्यात पंतप्रधान घरकुल आवास योजना-ग्रामीण अंतर्गत २०२५-२६ करिता १८ हजार ७ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाले आहेत. लाभार्थ्यांनी ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन करावेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.

         पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत घरकुल मंजुरी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले मंजूर झाले असून मतदारसंघात ड घरकुल सर्वेक्षणाचे काम सुरू असताना ब सर्वेक्षण बाबत आ.सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार भेट घेऊन  लक्ष वेधल्याने लाभार्थीच्या घरकुल मंजुरी मध्ये लाभार्थ्यांचा जास्तीचा फायदा असून सर्वाधिक घरकले मंजूर केल्याबद्दल केंद्र सरकार व राज्य सरकारचे आ.सुरेश धस यांनी आभार मानले आहे.यामध्ये आष्टी ७३०२,पाटोदा ५९१५,शिरूर कासार ४७९० तिन्ही तालुक्यात एकूण १८ हजार ७ घरकुले मंजूर झाले असून त्या यादीतील लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे.यासाठी ग्रामपंचायतचा जागा उपलब्धेप्रमाणे पीटीआर किंवा सातबारा,आधार बँक पासबुक या आवश्यक कागदपत्राची पूर्तता संबंधित गावातील ग्रामसेवक किंवा ग्रामीण गृहनिर्माण अभियंता यांच्याकडे करावेत.घरकुल यादीत दिलेल्या लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे कागदपत्रे  ऑनलाइन प्रणाली मार्फत करून घ्यावेत म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता वितरण जमा होण्यास सुलभ जाईल.

आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून ऑनलाईन करावेत या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार सुरेश धस यांनी केले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.