चोभा निमगावच्या परिसरात
बिबट्याच, नागरीकांनी सतर्क राहावे.
वन विभागाकडून पाहणी : पाऊलखुणाही आढळल्या
कडा : राहुल गाडे
आष्टी तालुक्यातील निमगाव चोभा, पैठण-बारामती रोडलगत असलेल्या धस वस्तीवर उसाच्या शेतात रविवारी दुपारी सोपानराव थेटे या शेतकऱ्याला बिबट्याचे अचानक दर्शन झाले होते. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकळी उशिरा जाऊन पाहणी केली असता तो बिबट्याचाच असल्याची माहिती पाऊल खुणावरून निष्पन्न झाले आहे.आष्टी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याची मनातील भीती संपत नाही तोच आता परत चोभानिमगाव परिसरातील सोपानराव थेटे या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात रविवारी दि.२२ बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने त्यांनी जीव मुठीत धरून वस्तीकडे धाव घेतली. यानंतर नागरिकांनी टोळक्याने पाहणी केली पण कुठेचकाही दिसून आले नसल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी आष्टी येथील वनविभागाच्या लोकांना याची दूरध्वनीवरून माहिती दिली.
दुसऱ्या दिवशी वनविभागाकडून वनरक्षक बाबासाहेब शिंदे, अशोक काळे, एस.व्ही. शेटे, वनमजूर देवराव कुमखाले, युनूस शेख यांनी जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली.यावरून तो बिबट्याच असल्याची खात्री वनविभागाकडून करण्यात आली आहे. तरी या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा,अशी मागणी माजी सरपंच विजय शेळके यांनी केली आहे.
*****************
नागरिकांनी दक्षता घ्यावी.
चोभानिमगाव परिसरात वनविभाकडून बिबट्या दिसलेल्या शेतात जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली आहे.
यानंतर तो बिबट्याच असल्याचे निष्णन्न झाले आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी.बिबट्या दिसल्यास संपर्क साधावा, असे आवाहन माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केली आहे.
stay connected