आष्टीतील खाडे कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचे यश
इ ५ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत क्लास
आष्टी। प्रतिनिधी
मूल्याकंन पद्धतीने बारावीचा निकाल लागला. याही पद्धतीच्या परीक्षेमध्ये क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश मिळवले आहे. सुमैय्या आत्तार ९६.५०% मार्क मिळून प्रथम क्रमांक तर श्रेयशा चव्हाण ९३% द्वितीय, पूर्वा मेहेरकर ९२% तृतीय असे क्रमांक मिळवले आहेत. क्लासेसच्या वतीने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले या विद्यार्थ्यांना संचालक प्रा युवराज खाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
गेल्या २१ वर्षांपासून आष्टी शहरात नावारूपाला आलेल्या खाडे कोचिंग क्लासेस पाल्यांच्या सेवेसाठी यशस्वीपणे कार्यरत आहे कित्येक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, ग्रामसेवक, तलाठी, प्राध्यापक, माध्यमिक शिक्षक इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर गावी जातात पण काही पालकांची आर्थिक परिस्थिती पाल्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठविण्याकरिता पुरेशी नसते विद्यार्थ्यांना शहरी पेक्षा कमी फीमध्ये क्लासेस मध्ये प्रवेश दिला जातो या वर्षी पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत मध्ये ऑनलाईन शिकवले जाणार आहे या बॅचेस दि १ सप्टेंबरपासून सुरू होतील तरी पालक व विद्यार्थ्यांनी क्लासेसशी संपर्क करावा तर नववी, दहावी, अकरावी, आणि बारावीच्या बॅचेस पंधरा दिवसापूर्वी सुरू झालेल्या आहेत. सर्व बॅचेस ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे असे क्लासेसचे संचालक प्रा युवराज खाडे यांनी सांगितले.
stay connected