*सुलेमान देवळा येथे मोफत ॲटीजन टेस्ट कॅम्प*

 *सुलेमान देवळा येथे मोफत ॲटीजन टेस्ट कॅम्प* 

कडा प्रतिनिधी (शेख सिराज)



              कोरोना चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे मोफत एंटीजन टेस्ट कॅम्प ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की यामध्ये एकूण दिडसे टेस्ट मोफत करण्यात आल्या . यामध्ये 149 टेस्ट निगेटिव्ह आल्या व एक टेस्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली नागरिकांनी टेस्ट कॅम्पला उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला. व अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने  टेस्ट करून घेण्यात आले. व्यक्ती पॉझिटिव निघाली असून त्यांना कामधेनु कोवीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले .असेच सर्वांनी सहकार्य केले तर गाव कोराना मुक्त होण्यासाठी वेळ लागणार नाही असे आव्हान करण्यात आले . गावचे सरपंच  नामदेव घोडके , उपसरपंच  शरद अंबादास घोडके, आजिनाथ गायकवाड , पांडुरंग घोडके , बाळासाहेब तोरडमल , हरिओम घोडके, माऊली घोडके , शहानवाज पठाण (पत्रकार) ,पंडित घोडके , भाऊसाहेब सुंबे, परमेश्वर घोडके, भरत जालिंदर घोडके, अमोल डहाळे, नंदू घोडके,पवन येवले, अक्षय घोडके, दिपक दहाळे,भिमराव भादवे, आकश खोरदे, सोहेल पठाण, आप्पा वाडेकर,आजिनाथ गडकर, बाबु पठाण, तसेच वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.