शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मा.आ.भीमसेन धोंडे यांनी केले भगव्या गुढीचे पुजन
आष्टी (प्रतिनिधी): दि.०६ जून हा छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या राज्याभिषेकाचा सुवर्णक्षण असून शून्यातून विश्व उभे करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला सदैव प्रेरणा देणारी घटना म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! दि.०१ जून २०२१ रोजी राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने 'भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी' राज्यातील गावोगावी प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद भवनावर उभारुन "शिवस्वराज्य दिन" साजरा करावा असा शासन निर्णय जाहीर केला.
ज्या भूतकाळाकडे पाहिले की, भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी प्राप्त होते असा शौर्याचा इतिहास या मातीत घडविणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त 'शिवस्वराज्य दिन' आष्टी येथील पंचायत समिती कार्यालयात साजरा करत भगवी गुढी उभारण्यात आली. आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे जेष्ठ नेते मा.आ.भीमसेन धोंडे यांनी भगव्या गुढीचे पुजन केले. यावेळी मा.आ.भीमसेन धोंडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज जातीधर्माचा विचार न करता सर्वांना सोबत घेऊन चालणारे सामान्यांच्या हृदयातील राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्रात नवे युग निर्माण करणारी घटना आहे, या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि आज छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गौरवशाली इतिहासाने महाराष्ट्रासह भारतीयांचे प्रेरणा व उर्जास्थान बनले आहेत.
यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर नाना, आष्टी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, सभापती बद्रीनाथ जगताप, उपसभापती रमेश तांदळे, पं.स.सदस्य आदिनाथ सानप, अशोक मुळे, कडा कृ.उ.बा. समितीचे मा.सभापती राजेंद्र दहातोंडे, इंजि.तळेकर आप्पा, पत्रकार उत्तम बोडखे, दादासाहेब जगताप, पंचायत समिती सर्व सदस्य, कर्मचारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
stay connected