पाटोदा येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात
पाटोदा = अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला हि उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या,व शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडाचा विनाश घडवत भूमीपुत्रांच्या मनामनात स्वांतंत्र्याची उर्मी निर्माण करुन,"सार्वभौम" स्वराज्य स्थापन करणाऱ्या महान युगपुरुष छञपती शिवाजी महाराज सहा जून शिवराज्याभिषेक दिना निमित्त पाटोद्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला शिवराज्याभिषेक दिना निमित्त पाटोदा तालुक्यातील छञपती शिवाजी महाराज चौकात छञपती शिवाजी महाराज प्रतिमेस अभिवादन करताना कॉग्रेसनेते जुबेरभाई चाऊस,माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गर्जे, मुख्याध्यापक एल.आर.जाधव सर नगरपंचायत सभापती राजु (भैय्या) नगरसेवक वसीम भाई ,डॉ गोरे,बाळु बामदळे,बाबा तिपटे, पञकार गणेश शेवाळे, राहुल बामदळे,गणेश सानप,भोडवेशेठ,शंकर चौगुले,यांच्या सह शेकडो शिवभक्तांनी पाटोदा शहरातील छञपती शिवाजी महाराज चौकातील छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन केले
stay connected