फळबागा वाया जाऊ देणार नाही : केंद्र आणि राज्य शासनाकडून आर्थिक उपयोजना करण्यासाठी अथक परिश्रम घेणार.. -- -- आ.सुरेश धस
शास्त्रोक्त पद्धतीने फळबाग लागवड करा.. - डॉ.गणेश मंडलिक
आष्टी प्रतिनिधी यापूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये सन 2012 -2014 या कालावधीमध्ये राज्यमंत्री असताना नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांचे मार्फतीने विविध आकाराचे शेततळे निर्माण केले त्याच धर्तीवर आता फळबाग असो वा नसो शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर शेततळे मंजूर करावे आष्टी तालुक्यामध्ये 9210 पाटोदा तालुक्यामध्ये 735 आणि शिरूर कासार तालुक्यामध्ये 811 फळबाग धारक शेतकरी असून या दुष्काळी परिस्थितीमध्ये फळबागा वाचवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे परंतु शेतकऱ्यांनी घाबरू नये कोणत्याही परिस्थितीत तुमच्या फळबागा वाया जाऊ देणार नाही असे प्रतिपादन आमदार सुरेश धस यांनी केले. आष्टी येथील दुष्काळी परिस्थिती फळबागा वाचवण्यासाठी उपाय योजना या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये ते बोलत होते यावेळी मुख्य मार्गदर्शक डॉक्टर गणेश मंडलिक बद्रीनाथ जगताप परमेश्वर शेळके विष्णुपंत चव्हाण पाटोदा पंचायत समिती माजी सभापती केशव रसाळ आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे तसेच पाटोदा आणि शिरूर तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यां विषयी अत्यंत संवेदनशील नेतृत्व असून त्यांचेवर कितीही खालच्या पातळीवर टीका केली तरी त्यांनी दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांबाबत तात्काळ निर्णय जाहीर केले आहेत दिवाळीपूर्वी हेक्टरी 11,500/- रु.अनुदान मिळणार असल्याचे जाहीर केले आहे
आष्टी पाटोदा आणि शिरूर कासार तालुका कृषी अधिकाऱ्यांनी फक्त कागदोपत्री असलेल्या केवळ अनुदानासाठी असलेल्या फळबागा बंद कराव्यात आणि खरे शेतकऱ्यांना न्याय द्यावा असे सांगून ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांच्या फळबागासाठी शासनाकडून अनुदान प्राप्त करून घेऊच वेळप्रसंगी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचेकडे निवडक 200 शेतकऱ्यांना विमानाने घेऊन जाण्याची आपली तयारी आहे त्याचबरोबर गृहमंत्री अमित भाई शहा यांचे कडे जाऊन आपत्ती निवारण व्यवस्थापन निधीतून निधी प्राप्त करून घेऊ शिवराज सिंग चव्हाण हे चार टर्म मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय कृषिमंत्री आहेत गृहमंत्री अमित शहा देखील धाडसी व्यक्तिमत्व असून सहकार खाते देखील त्यांनी अत्यंत चांगले चालवले आहे आपत्ती व्यवस्थापन विभाग त्यांच्याकडे असल्यामुळे शेतकऱ्यांना ते मदत करतील असा विश्वास आहे फळबाग धारक शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 1 लक्ष 35 हजार रुपये अनुदान मागणी करू आणि मनरेगा योजनेतून प्रत्येक फळबाग धारक शेतकऱ्यांसाठी कामे मंजूर करून घेऊन मजुरीची अधिकची रक्कम शेतकऱ्यांना मिळेल असे प्रस्ताव तयार करून त्यांना मंजुरी घेऊ कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या फळबागा वाया जाऊ देणार नाही याबाबत आपण अथक परिश्रम घेऊ फळबाग धारक शेतकऱ्यांनी धीर सोडू नये निश्चिंत रहावे असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी फळबाग धारक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खामगाव तालुका गेवराई येथील विशेषज्ञ डॉ.गणेश मंडलिक म्हणाले की महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करत असून निर्यातीमध्ये अग्रेसर आहे यावर्षी मात्र अलनिनो या नैसर्गिक संकटामुळे निसर्गाची साथ नसल्यामुळे पाऊस अत्यंत अपराध झालेला आहे तापमानात वाढ होऊन कोरडी हवा निर्माण झाली असून जमिनीतला ओलावा कमी झाला आहे या संभाव्य दुष्काळ परिस्थितीवर जनावरांना चारा निर्माण करण्यासाठी जानेवारी फेब्रुवारीपासूनच उपाययोजना करणे आवश्यक होते त्या उपाययोजना झाल्या नाहीत शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने फळबाग लागवड केली पाहिजे त्यामध्ये माती परीक्षण आणि फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड त्या पद्धतीने करावी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खते जास्त वापरावीत मार्च एप्रिल या महिन्यातच खड्डे तयार करावेत पाऊस पडल्यानंतर शासकीय मान्यता प्राप्त दर्जेदार रोपवाटिकेतूनच रोपे खरेदी करावीत साधारणतः 150 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच फळबाग लागवड करावी यावर्षी दुष्काळी परिस्थिती राहणार असून तापमान वाढणार असल्यामुळे उष्ण वारे वाहणार असून झाडे जगवणे एवढेच आव्हान आपणास समोर असणार आहे त्यामुळे उपलब्ध आहे ते पाणी अति सूक्ष्म सिंचन पद्धतीने प्लॅस्टिकच्या बाटल्या जमिनीमध्ये पुरून केवळ मुळापर्यंत पाणी मिळेल अशी यंत्रणा राबवावी याबाबतचे प्रात्यक्षिक त्यांनी उपस्थित फळबाग धारक शेतकऱ्यांसाठी दाखवले अधिकच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी त्यांचा मोबाईल क्र.9420818562 यावर संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन गणेश शिंदे माऊली जरांगे सचिन रानडे अजित मुळे यांनी केले



stay connected