साबलखेड च्या शैलेश साबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘बेस्ट इंजिनिअर अवॉर्ड’साठी निवड

 साबलखेड च्या शैलेश साबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या ‘बेस्ट इंजिनिअर अवॉर्ड’साठी निवड



आष्टी  (प्रतिनिधी) : शेवगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागातील  शाखा अभियंता शैलेश विष्णू साबळे यांची महाराष्ट्र शासनाच्या सन २०२५-२६ च्या मानाच्या ‘बेस्ट इंजिनिअर अवॉर्ड’साठी निवड झाली आहे. नागरी अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. शैलेश साबळे हे मूळचे आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी डॉ . विष्णु साबळे यांचे चिरंजिव आहेत . त्यांच्या या यशाबद्दल आष्टी तालुक्यातील सर्व मित्रपरिवार व स्नेहीजनांनी त्यांचे अभिनंदन केले . साबळे कुटूंबीयांनी वैद्यकीय क्षेत्रासोबतच इंजिनिअरींग क्षेत्रात साबलखेड गावचे नाव उंचावले आहे .



शाखा अभियंता शैलेश साबळे यांना

या पुरस्कारामध्ये वैयक्तिक सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे मूल्यमापन केल्यानंतर शैलेश साबळे यांच्या कार्याची निवड करण्यात आली. त्यांच्या कामाचे मूल्यमापन सार्वजनिक हित आणि लोककल्याणाच्या दृष्टिकोनातून करण्यात आले.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, उप अभियंता प्रल्हाद पाठक , अधीक्षक अभियंता विवेक मलुंडे आणि कार्यकारी अभियंता युवराज कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश साबळे यांनी शेवगाव उपविभागात विविध कामे केली आहेत.


दरम्यान, राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा अभियानात शेवगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवला होता.


१५ सप्टेंबर रोजी भारतरत्न सर एम. विश्वेश्वरय्या यांची जयंती ‘अभियंता दिन’ म्हणून साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शैलेश साबळे यांची बेस्ट इंजिनिअर अवॉर्डसाठी झालेली निवड साबलखेड व शेवगावसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल आमदार मोनिका राजळे ,आ सुरेश धस , मा आ भिमराव धोंडे , साहेबराव दरेकर , बाळासाहेब आजबे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. शैलेश साबळे यांच्या भगिनी स्नेहल विष्णु साबळे ही उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणून ठाणे येथे कार्यरत आहे . 2023 ला MPSC मधून तीची निवड झाली . दोन्ही भावंडांचे माध्यमिक शिक्षण मोतीलाल कोठारी विद्यालय कडा येथे झालेले आहे . साबळे कुटुंबियांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर