‘भाजपात कसलीही गटबाजी नाही’, जिल्हा बँकेबाबत १५ सप्टेंबरनंतर भूमिका स्पष्ट करू - सभापती प्रा. राम शिंदे यांची पत्रकारांच्या प्रश्नांना बगल
नासीर पठाण । जामखेड
जामखेड - जामखेड शहरातील सिटी केअर सेंटर व सिटी केअर फार्मसीच्या उद्घाटनप्रसंगी राजकीय घडामोडींवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सभापती प्रा. राम शिंदे यांनी भाजपातील गटबाजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करून पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली .
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील सुप्त युद्ध हे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असतात.अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे . सभापती प्रा .राम शिंदे यांचा एक गट तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा एक गट पडल्याच्या पाहायला मिळत आहे . त्यामुळे भाजपचे हे दोन्ही नेते एकमेकांच्या कार्यक्रमात साधी उपस्थिती देखील लावत नाहीत याबाबत विधान परिषदेचे सभापती प्रा .राम शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सुरुवातीला आमच्यामध्ये गटबाजी नसल्याचे म्हटल आहे . मात्र दुसरीकडे अहिल्यानगर मध्ये झालेला भाजप कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भाजपचे स्थानिक नगरसेवक हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या नगरसेवकांना नेमकी कोणाकडून सूचना देण्यात आली होती .याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.. पुढे बोलताना सभापती प्रा . राम शिंदे म्हणाले की मी विधानपरिषदेचा सभापती आहे मी माझ्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतो तर ते पालकमंत्री आहेत ते त्यांच्या कार्यक्रमांमध्ये व्यस्त असतात तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सभापती प्रा . राम शिंदे यांनी तीन वर्षाचा वनवास केला तर खऱ्या अर्थाने जिल्हा बँकेवर राम राज्य येणार का ? असे पत्रकारांनी विचारले असता सभापती प्रा .राम शिंदे म्हणाले की, पंधरा तारखेला अंतिम यादी येईल त्यानंतर काय होतं पाहू असं म्हणत सभापती प्रा . राम शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडण्यास बगल दिली आहे .
जामखेड शहरात आयोजित सिटी केअर फार्मसीच्या उद्घाटन समारंभात सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी जिल्हा बँकेसह भाजपातील अंतर्गत राजकीय घडामोडींविषयी प्रश्न उपस्थित केले याला सभापती प्रा . राम शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरातुन बगल दिली.
या कार्यक्रमास महालिंग नगरे महाराज, प्रा. मधुकर राळेभात, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, डॉ. भगवानराव मुरूमकर, सभापती पै. शरद कार्ले, अमित चिंतामणी, ॲड. प्रविण सानप, तात्याराम पोकळे, पवन राळेभात, अर्जुन म्हेत्रे, प्रा. विकी घायतडक, प्रविण चोरडिया, मोहन पवार, बाजीराव गोपाळघरे, तुषार बोथरा, अल्ताफ शेख, राहुल बेथमुथ्था, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, लहू यादव, अर्थव यादव, वैभव यादव, राजश्री यादव, सुनंदा यादव, अजिंक्य यादव, सौरभ यादव, अक्षय म्हेत्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



stay connected