बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी सत्कार

 बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा आ. सुरेश धस यांच्या निवासस्थानी सत्कार




आष्टी (प्रतिनिधी) बीड जिल्हा वकील संघाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आष्टी येथील अद्वैतचंद्र निवासस्थानी आ. सुरेश धस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी आ. सुरेश धस यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित वकिलांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.


बीड जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. बी. एस. बोडखे, उपाध्यक्षपदी ॲड. गोपाल सर्वज्ञ, सचिवपदी ॲड. नितीन शिंदे तर ग्रंथपालपदी ॲड. वनदेव सूळ यांची निवड झाल्याबद्दल आ. सुरेश धस यांनी त्यांचे अभिनंदन केले.


न्यायव्यवस्थेतील महत्त्वाचा दुवा म्हणून वकील संघाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हा वकील संघाची वाटचाल अधिक सक्षम, सकारात्मक आणि समाजाभिमुख होईल, असा विश्वास आ. सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केला.


या प्रसंगी माजी अध्यक्ष ॲड. रोहिदास येवले, माजी सचिव ॲड. शहादेव ननवरे, मावळते अध्यक्ष ॲड. सुभाष पिसोरे, तसेच ॲड. राजू शिंदे, ॲड. वाय. पी. अनवणे यांच्यासह अन्य मान्यवर वकील उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर