शेती क्षेत्रात उच्चतंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज - डॉ अशोक ढगे

 शेती क्षेत्रात उच्चतंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज  - डॉ अशोक ढगे





नेवासा तालुक्यातील रेणुका माता सभागृहात नेवासा फाट्यावर कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड अंतर्गत नॅनो डीएपी उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी चर्चा संवाद उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रावसाहेब कांगूने पाटील होते. या चर्चासत्राचे वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून उस्फूर्तपणे चर्चेत सहभाग घेतल्यामुळे परिसंवादाला रंगत आली विभागीय कृषी विद्यापीठा डॉ विनेश रेगे, माजी कुलगुरू डॉ अशोकराव ढगे, कृषी विज्ञान केंद्र दहिगाव चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ शामसुंदर कौशिक व्यासपीठावर उपस्थित होते. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी प्रतिपादित केले की नॅनो टेक्नॉलॉजी वापरून डीएपी खत तयार केलेले शेतकऱ्यांनी अवश्य वापरावे व खताच्या खर्चात बचत करावी शेती क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज झाली आहे. डॉ रेगे यांनी नॅनो डीएपी हे लिक्विड फर्टीलायझर असून फवारणी द्वारे द्यावे कारण या खताच्या कणांची रचना अतिसूक्ष्म असल्यामुळे वनस्पतीच्या पानावरील मोठ्या छिद्रावाटे ती त्वरित सहज शोषले जातात व खतांचा चांगला कार्यक्षम वापर होतो खते वाया जात नाहीत. डी ए पी पिकांमध्ये अत्यंत प्रभावी प्रमाणे काम करते त्यामुळे उत्पादनात वाढ होते. डॉ कौशिक यांनी खतांचा वापर करताना पिके व त्यांची संवेदनशील अवस्था याचा विचार करावा रासायनिक खतांवर फार मोठ्या प्रमाणात शासन सबसिडी देत आहे त्याचा तंतोतंत वापर करावा त्यामुळे राष्ट्रीय बचत होईल. कोरोमंडल ने उच्च तंत्रज्ञानावर शेतकऱ्यांचा परिसंवाद घडवून आणल्याबद्दल डॉ ढगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. सभापती रावसाहेब कांगणे यांनी शेतकऱ्याच्या शेतावर चांगले रिझल्ट आल्याचे आवर्जून सांगितले . सहाय्यक व्यवस्थापक उदय चौधरी तसेच व्यवसाय व्यवस्थापक माननीय किरण गिरी व शेतकरी चर्चासत्राचला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्यांना भरीव भरीव बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कृषी विद्या वेता प्रणव जाधव यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर