लाटेवस्ती (महाळूंग) शाळेतील शिक्षक उकिरडे व श्रीम तांबोळी यांचा निरोप समारंभ

 *लाटेवस्ती (महाळूंग) शाळेतील शिक्षक उकिरडे व श्रीम तांबोळी यांचा निरोप समारंभ*. 




    *शाळा लाटेवस्ती (महाळुंग) येथील शिक्षक दिलीप उकिरडे व श्रीम रेहाना तांबोळी यांची बदली झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ, यांचे वतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता*. 

*कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विस्तार अधिकारी संध्या नाचणे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून जि प च्या माजी  सदस्या अरुणा जाधव मॅडम , माजी विस्तार अधिकारी हर्षवर्धन नाचणे होते*. 

    *लाटेवस्ती (महाळुंग) शाळेत दिलीप उकिरडे व श्रीम रेहाना तांबोळे यांनी अध्यापनाचे काम उत्कृष्टरित्या केले शाळेचा पट गुणवत्ता सतत वाढविली, विविध उपक्रम राबवले, पट नोंदणी, वृक्षारोपण, महिलांचे मेळावे घेऊन आरोग्य विषयी जनजागृती निर्माण केली, विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन केले. शाला बाह्य विद्यार्थी राहणार नाही याची दखल घेतली, लाटेवस्ती शाळा गुणवत्ताधारक शाळा म्हणून ओळख निर्माण केली .विविध सामाजिक संस्थेकडून* *शाळेसाठी मदत मिळवून घेतली व त्याचा उपयोग विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविला .असे आदर्शवत शिक्षक दिलीप उकिरडे व श्रीम. रेहाना तांबोळी यांची बदली झाल्याने पालकांनी   निरोप समारंभ आयोजित करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले*. 

    *कार्यक्रमासाठी सदाशिव शिंदे मारुती , मारुतीलाटे, शामराव लाटे, राजाराम काळे*, *कुबेर रेडे पाटील, साहेबराव लाटे, राहुल यादव, मारुती काळे दाऊद मुलानी, सावंत काका, सविता गायकवाड,  स्वाती लाटे शिक्षणप्रेमी वनिता कुदळे आदी उपस्थित होते*.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.