मुख्यमंत्री सहायता निधीतून आणखी चार रुग्णांना मदतीचा आधार आ. सुरेश धस यांच्या माध्यमातून ३ लाख ६० हजार रुपयांची मदत मंजूर; आष्टीसह बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांनाही मदतीचा हात

 मुख्यमंत्री सहायता निधीतून आणखी चार रुग्णांना मदतीचा आधार


आ. सुरेश धस यांच्या माध्यमातून ३ लाख ६० हजार रुपयांची मदत मंजूर; आष्टीसह बाहेरील जिल्ह्यातील रुग्णांनाही मदतीचा हात




आष्टी (प्रतिनिधी) : गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून सातत्याने मदत मिळवून दिली जात आहे. याच पाठपुराव्यातून आता चार रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी एकूण ३ लाख ६० हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.


यामध्ये शितल राजू म्हसके रा. कोरेगाव चिखली (वाळकी), जि. अहिल्यानगर यांच्या उपचारांसाठी ८० हजार रुपये, तर प्रकाश थोरे रा. तिंतरवणी, ता. शिरूर कासार यांच्या उपचारांसाठी ८० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर झाले आहेत.


तसेच शंकर कुसळकर रा. कडा, ता. आष्टी यांच्या वैद्यकीय उपचारांसाठी ५० हजार रुपये, तर पंकज बोडखे रा. आनंदवाडी, ता. आष्टी यांच्या उपचारांसाठीही मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.




कागदपत्रातील अडचणही झाली दूर


प्रकाश थोरे यांच्या मदतीच्या प्रस्तावासमोर कागदपत्रांची अडचण निर्माण झाली होती. आधारकार्डवर आडनाव ‘थोरे’, तर रेशनकार्डवर ‘थोरवे’ अशी नोंद असल्याने प्रस्तावाच्या प्रक्रियेत अडथळा आला होता. मात्र संबंधित प्रकरण तहसील कार्यालयाकडे पाठवून अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आवश्यक पाठपुरावा करण्यात आला आणि ही अडचण दूर करून त्यांना ८० हजार रुपयांची मदत मंजूर करून घेण्यात यश आले.


मतदारसंघाच्या पलीकडेही मदतीचा हात


आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून केवळ आष्टी विधानसभा मतदारसंघातीलच नव्हे, तर बाहेरील जिल्ह्यातील गरजू रुग्णांनाही मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळत आहे. शितल राजू म्हसके हे अहिल्यानगर जिल्ह्यातील असल्याने त्यांच्या उपचारांसाठीही मदतीचा पाठपुरावा करण्यात आला. रुग्ण कोणत्या गावाचा किंवा कोणत्या जिल्ह्यातील आहे, यापेक्षा त्याला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज आहे का, याला प्राधान्य देत मदतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे या माध्यमातून दिसून येत आहे.




यापूर्वीही अनेक रुग्णांना मदत


यापूर्वीही आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीतून अनेक गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्यात आली आहे. अलीकडेच जनाबाई पांडुळे यांना ८० हजार, ज्ञानदेव गणगे यांना ५० हजार आणि अशोक जायभाय यांना ४० हजार रुपये, अशी एकूण १ लाख ७० हजार रुपयांची मदत मंजूर झाली होती. त्यानंतर आता या चार रुग्णांसाठी ३ लाख ६० हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे.


वैद्यकीय उपचारांचा वाढता खर्च सर्वसामान्य कुटुंबांसाठी मोठे आर्थिक संकट ठरत असताना मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळणारी मदत रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी मोठा आधार ठरत आहे. गरजू रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून सुरू असलेला पाठपुरावा सातत्याने सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर