“गणित विषय सोपा करण्यासाठी अबॅकस शिक्षण गरजेचे” – सहसंचालक रमाकांत काठमोरे

 “गणित विषय सोपा करण्यासाठी अबॅकस शिक्षण गरजेचे” – सहसंचालक रमाकांत काठमोरे




इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमीची राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा उत्साहात संपन्न


देशभरातील 877 विद्यार्थ्यांचा सहभाग; 5 मिनिटांत गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी जिंकली दाद


अहिल्यानगर (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीती दूर करून त्यांना झटपट व अचूक गणित सोडविण्याची क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडली. नगर–कल्याण रोडवरील सुखकर्ता लॉन येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यासह देशभरातील 877 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


अकॅडमीच्या संचालिका अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे आणि दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठमोठी गणिते अवघ्या पाच मिनिटांच्या आत अचूक सोडवून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांच्या वेगवान गणनकौशल्याने पालक व उपस्थित मान्यवर प्रभावित झाले.



स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील सहसंचालक रमाकांत काठमोरे हे होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “शालेय जीवनात गणित विषय सोपा व रंजक करण्यासाठी अबॅकस शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्ता, एकाग्रता, स्मरणशक्ती आणि तार्किक विचारक्षमतेच्या विकासासाठी अबॅकस व वैदिक गणित ही काळाची गरज आहे.” देशभरातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून इन्स्पायर अबॅकस अँड वेदिक मॅथ अकॅडमी करत असलेल्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.


कार्यक्रमास अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर ज्योतीताई गाडे यांची विशेष उपस्थिती लाभली.


राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या आराध्या भाग्यवंत हिला ₹3,000 चा धनादेश देऊन गौरविण्यात आले. तसेच राजवीर परदेशी, श्रावणी काळे, एस. हासीनी आणि साहिल मिंड या चॅम्पियन विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच प्रदान करून सन्मानित करण्यात आले.


राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पूजा पाटील, अनुष्का सोनवणे, वेदिका सायंबर, रिद्धी कासार, स्नेहल परकाळे, शिवतेज जाधव, स्वरा खंडागळे, जोया हवालदार, ऐश्वर्या सायंबर, पूर्वा बेदरे, सार्थक गोरे, शिवश्री व्यवहारे, शिवांश खंदारे, शौर्य जाधव, शिवतेज धराडे, आराध्या भाग्यवंत, प्रेरणा वाबळे, सोहम खंडागळे, नियती भागवत, पवनी कारंडे, अली काझी आणि अर्णव कर्डीले या विद्यार्थ्यांना चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करून गौरविण्यात आले.


यावेळी अकॅडमीतील उत्कृष्ट कार्याबद्दल सोमनाथ बोचरे यांना स्टार टीचर अवॉर्ड, तर प्रतिक्षा बर्डे, संपदा काटे, सविता ठोंबरे, सोनाली मानोरकर आणि क्षितिजा वाघ यांना बेस्ट टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.



कार्यक्रमास आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती गोपाळभाऊ रकटाटे, माजी कृषी अधिकारी बलभिम शेळके, पांडुरंग माढेकर, माणिकराव विधाते, संतोष यादव, अमोल घोलप, ज्ञानदेव पांडुळे, लाभेश रणसिंग, शिवाजी लंके, सुनिल पंडित, भाऊसाहेब कबाडी, गजेंद्र राठोड, नामदेव रकटाटे, बाजीराव अनभुले, विद्या यादव, पंगा शाम मुथैय्या, कोला राजय्या वेणू, शरद वाळके, कृष्णा पवार आदी मान्यवरांसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अर्चना शेळके, सत्यशिला भद्रे, दादासाहेब शेळके, रविंद्र रकटाटे, श्रीतेज रकटाटे तसेच अकॅडमीच्या सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादासाहेब शेळके यांनी केले, सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले, तर आभार रविंद्र रकटाटे यांनी मानले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

फॉलोअर