छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचा फज्जा..
संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा..भाई ॲड नारायण गोले पाटील
माजलगाव, प्रतिनिधी माजलगाव मतदार संघात आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचा फज्जा उडाला असून नियोजनाचा अभाव दिसून आलेला आहे. त्यामुळे नागरिक आणि लाभार्थ्यांची गैरसोय झाली असून यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याने संबंधिताची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी केली आहे.
शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचणे शिबिराचा उद्देश असतांना प्रशासनातल्या आणि महसूल विभागातल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्याबाबत कुठेही प्रचार व प्रसार केला नाही या शिबिराची सामान्य नागरिकांना माहितीच नव्हती, केवळ आमदार महोदयांचे कार्यकर्तेच फोन करून करून बोलावण्यात आल्याने या शिबिरापासून हजारो नागरिक वंचित राहिले आहेत.
महसूल प्रशासनासह प्रशासनातल्या अनेक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरिकांची आर्थिक लूट केलेली असून सदरील लुटीचा प्रकार वरिष्ठा समोर येऊ नये म्हणून तसेच अनेक विभागातील कर्मचारी व अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराचा उहापोह वरिष्ठ अधिकाऱ्या समोर होऊ नये म्हणून त्यांनी या कार्यक्रमाची जाणीवपूर्वक माहिती ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांना दिलेली नसून या शिवाय प्रचार आणि प्रसारासाठी आलेला निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच घेतलेल्या कार्यक्रमात कुठल्याही सामाजिक संघटना व राजकीय पक्षांना निमंत्रण दिले नसल्यामुळे हजारो नागरिकापर्यंत सबंधित कार्यक्रमाची माहिती आलेली नाही त्यामुळे संबंधित तिन्ही माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि संबंधित मंडळाधिकारी,तलाठी यांच्यासह प्रशासनातले विविध अधिकारी भ्रष्टाचाराच्या कामात गुंतलेले असून त्यांना कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यास वेळ मिळाला नसल्याची खरमरीत टीका शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाचिटणीस तथा नेते भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे..


stay connected