*शिवाबाबा वाघ साहित्यिक प्रतिष्ठानकडून.. कथालेखक बाळासाहेब देशमुख सन्मानित*
अहिल्यानगर :- शिवाबाबा वाघ साहित्यिक प्रतिष्ठान पिंपळगाव जलाल ( येवला) आयोजित 'शहादू शिवाजी वाघ पाचवा स्मृती राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार' प्रदान सोहळा , जलालपुर तालुका येवला , येथे ०४ जून २०२६ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार राऊत हे होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक दादासाहेब कोते यांनी केले. प्रमुख पाहुणे माजी आमदार स्नेहलता कोल्हे मॅडम , ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे , गझलकार रज्जाक शेख, कवयित्री स्वाती ठोंबरे हे होते. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागातून साहित्यिक आले होते. कथा, कादंबरी ,कविता ,ललित प्रकारातील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सदर सोहळ्यामध्ये अहिल्यानगरचे कथालेखक बाळासाहेब देशमुख यांना, साहित्य लेखन,साहित्यिक योगदानाबद्दल , कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार राऊत, प्रमुख अतिथी ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ कवी आनंदा साळवे, विनय पिपरकर ,शर्मिला गोसावी , साहित्यिक प्रशांत वाघ हे मान्यवर उपस्थित होते. बाळासाहेब देशमुख यांचे रंग माझा वेगळा ,माणसे अशी.. अन् तशीही.., माणसे भिंगातून.., इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत. ज्येष्ठ साहित्यिक सदानंद भणगे , इतिहास अभ्यासक नवनाथ वाव्हळ यांनी , देशमुखांचे अभिनंदन केले आहे.


stay connected