*श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कडा येथे DBATU प्रथम सत्र परीक्षेत 100% निकाल*
कडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU) संलग्न श्री अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित अमोलक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कडा यांनी प्रथम सत्र परीक्षेत 100 % निकालाची उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमासोबतच प्राध्यापकांचे मार्गदर्शन व संस्थेचे शैक्षणिक वातावरण यामुळे हा यशस्वी निकाल प्राप्त झाला आहे.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट SGPA मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. त्यामध्ये:
1st - श्रुती नारायण राऊत (CSE) – SGPA 8.30
2nd - शिवानी सुनील नाथ (AIDS) – SGPA 8.28
3rd - ऋतुजा ज्ञानदेव अबदार (CSE) – SGPA 8.17
4th - राजनंदिनी विठ्ठल जिरेकऱ (AIDS) – SGPA 8.13
5th - साक्षी संजय कर्डिले (AIDS) – SGPA 8.07
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागप्रमुख, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, नियमित अभ्यास व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत उत्कृष्ट निकाल प्राप्त केल्याचे प्राचार्यांनी सांगितले.
महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आगामी काळातही अशाच उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीची परंपरा कायम राखण्याचा विश्वास व्यक्त केला.


stay connected