औसा तालुक्यात घरकुल योजनेमध्ये घोटाळा... औसा तालुक्यातील अनेक गावागावात घरकुल योजनेमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा

 औसा तालुक्यात घरकुल योजनेमध्ये घोटाळा...
औसा तालुक्यातील अनेक गावागावात घरकुल योजनेमध्ये घोटाळा झाल्याची चर्चा


 

अनेक गावात घरकुल अर्धवट तर कुठे घरकुल न बांधताच बिले उचल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

औसा तालुक्यात घरकुल योजनेभोवती कथित गैरव्यवहाराचे सावट गडद झाले असून अनेक गावांत घरकुले अर्धवट अवस्थेत राहिल्याच्या, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम सुरू होण्यापूर्वीच बिले उचलल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील गृहनिर्माण योजनेतील पारदर्शकता, देखरेख आणि निधीच्या वापरावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

औसा तालुक्यातील घरकुल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गोरीगरिबांच्या डोक्यावर छत देण्याचे स्वप्न सरकारचा असून 

 या योजनेच्या माध्यमातून गरजू व गोरगरीब लोकांना घरकुल देण्यासाठी एकीकडे सरकार कठीबद्ध  असताना मात्र गावातील लोकप्रतिनिधी कोण मात्र या योजनेसाठी गोरगरिबाची पिळवणूक करून एका घरकुलासाठी व घरकुल मंजूर करण्यासाठी दहा ते पंधरा हजार रुपयांचा दर ठरला असून. ठरलेल्या दराप्रमाणे गावपुढारी माध्यमातून प्रशासन दरबारी पैसे दिले की घरकुल मंजुरी होते व घरकुल मंजुरी झाल्यानंतर कुठलही बांधकाम न करता एक तर जुने घर दाखवून किंवा कुठलही बांधकाम न करता बिले उचलण्याचा प्रकार तालुक्यातील अनेक गावांमध्ये झाला आहे.औसा तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या असून गावकरी आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी होत आहे. अनेक ठिकाणी घरकुले केवळ अर्धवट उभारण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष बांधकाम पूर्ण न होताही हप्त्यांची रक्कम काढण्यात आल्याची चर्चा आहे.

घरकुल योजना ही गरिबांना हक्काचे पक्के घर मिळवून देण्यासाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे या योजनेत कोणताही गैरव्यवहार झाल्यास त्याचा थेट फटका लाभार्थ्यांना बसतो.

औसा तालुक्यातील घरकुल योजनेच्या कामाची उच्यस्तरीय चौकशीची गरज निर्माण झाली आहे. सध्या ग्रामीण भागातील चर्चेनुसार वं माहितीनुसार तक्रारी आणि चर्चांच्या पातळीवर हा मुद्धा जोर धरत आहे ; मात्र प्रशासकीय तपास, लेखापरीक्षण आणि लाभार्थ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा स्तरावरील यंत्रणांनी घरकुल लाभार्थ्यांची निवड, मंजुरी, बांधकामाची प्रगती आणि हप्त्यांचे वितरण यावर काटेकोर देखरेख ठेवणे अपेक्षित असते. तरीही काही ठिकाणी स्थानिक कर्मचाऱ्यांच्या संगनमताने निधीचा अपहार झाल्याची उदाहरणे समोर येत असल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी अधोरेखित होत आहेत.

या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यातील घरकुल योजनेतील चर्चेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी,वं घरकुल लाभार्थ्यांची प्रत्यक्ष घरकुल पाहणी आणि निधीवाटपाच्या सर्व नोंदींची तपासणी होणे आवश्यक असल्याचे स्थानिक वर्तुळातून सांगितले जात आहे. अशा चौकशीतूनच किती घरकुले अपूर्ण आहेत, कोणत्या टप्प्यावर अनियमितता झाली आणि जबाबदारी कुणाची आहे, हे स्पष्ट होईल.

घरकुल योजनेचा मूळ उद्देश गरिबांना सुरक्षित निवारा देण्याचा आहे; परंतु वारंवार समोर येणाऱ्या अनियमितता या उद्देशालाच धक्का देत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचा शासकीय योजनांवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे... औसा पंचायत समितीतील अनागोंदी कारभार कारवाईकडे नागरिकांचे लक्ष.

घरकुल योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांनी घरकुल न बांधताच मोठ्या प्रमाणात पैसा उकळल्याची जोरदार चर्चा गावोगावी होत असून.


 एक ही वीट न रचता घरकुल न बांधता लाभार्थ्यांचे सर्व पैसे खात्यावर वर्ग करणारा पंचायत समितीतील झारीचा शुक्राचार्य कोण याबाबत जोरदार चर्चा सुरू असून. 


प्रशासनाच्या या मनमानी मुळे शासनाच्या पक्का घर योजनेला घरघर लावण्याचे काम काही कर्मचारी करत आहेत चक्क घरकुल न बांधता चिरीमिरी घेऊन अनेक गावात बोगस घरकुल बिले उचण्याचा प्रकार गावोगावी झाल्याची चर्चा आहे.

औसा तालुक्यात घरकुल योजना मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची मोठी संख्या आहे यापैकी अनेकांनी घरकुल बांधले नाहीत तरी त्यांची सर्व बिले अदा करण्यात आली असल्याची चर्चा असून मोठ्या प्रमाणात शासकीय निधीचा गैरवापर झाला असल्याचे बोलले जात असून काही ठिकाणी तरी एकाच घरावर दोन तीन बिले काढल्याची चर्चा सुरू आहे..काही घरकुल विभागातील कर्मचारी  अँप वर कुठलेही फोटो अपलोड करून  तसेच जिओ टॅगिंग मध्ये  फोटो एक ठिकाणचा घर दुसऱ्याचे असे चित्र आहे. औसा तालुक्यात अनेक ठिकाणी सरपंचांच्या नातेवाईकांचा ग्रामपंचायत कामामध्ये हस्तक्षेप वाढला असल्याने शासकीय योजनेचे तीनतेरा  वाजले असून जे गाव पातळीवर काम करणारे कर्मचारी यांच्यावर दबाव टाकत आपणाला पाहिजे तसे काम करून घेत असल्याचे चित्र आहे.तरी तालुक्यातील गावोगावी राबविण्यात आलेली घरकुल योजनेची सखोल चौकशी व्हावी वं संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली जातेय...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.