*कॉकरोच जनता पार्टी चे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांच्यावरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला होय-डॉ जितीन वंजारे*
*संघोट्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याची सी बि आय चौकशी लावा, त्याच्या मुसक्या आवळा*
बीड प्रतिनिधी :- काल परवा राजस्थानच्या जयपुर मध्ये कॉक्रोज जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके नीट पेपर फुटी प्रकरण मध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी चालू केलेल्या आंदोलनामध्ये असताना मनूवादी विचारसरणीच्या संघुट्या गुर्जर नामक व्यक्तीने समोर येऊन अभिजीत दिपके यांच्यावर भ्याड हल्ला केला या हल्ल्याचा प्रथमता मी जाहीर निषेध करतो लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वतंत्र, स्वतःचे विचार आणि सत्तेमध्ये असणाऱ्या वाईट लोकांविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने सर्वांना दिलेली आहे परंतु आजकाल चे सरकार हुकूमशाही करत स्वतःच्या बगलबच्चांना हल्ले करण्यास पाठवत आहे. हल्लेखोरांना अभय देत आहे.असाच एक संघुटा मनूवादी विचारसरणीचा राकेश गुर्जर नामक व्यक्ती राजस्थानच्या जयपूर येथे नीट पेपर फुटी प्रकरणात शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी आंदोलनामध्ये उपस्थित असलेल्या अभिजीत दिपके यांच्यावर भ्याड हल्ला करतो आणि दहशत निर्माण करतो याचाच अर्थ मनुवाद्याच्या बुडाला चांगलीच आग लागल्याचे दिसत आहे.हा हल्ला म्हणजे लोकशाही आणि संविधानावरील हल्ला असून अभिजीत दिपके यांच्या पाठीशी संपूर्ण भारतातील युवावर्ग आहे.याचा विचार करून त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी असे आव्हाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीन वंजारे यांनी केले आहे.अभिजीत दिपके अमेरिकेमध्ये असताना त्यांना भारतात आल्यानंतर झेड प्लस सुरक्षा देण्यासंदर्भात मागणी करणारे डॉक्टर जीतीन वंजारे यांनी पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजीत दिपके यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्याचे आव्हान येथील पोलिस यंत्रणेला केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि अभिजीत दीपके यांना 24 तास झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी कारण ते भारताच्या युवा वर्गाचे हृदय स्थान बनलेले आहे. विद्यार्थी चळवळी चा मोहरा बनलेले आहेत.चालू वर्षी सत्तेमध्ये असणारे बीजेपी सरकार गेल्या बारा वर्षापासून सत्तेत आहे या काळामध्ये जवळजवळ साठ वेळा विविध परीक्षांमध्ये पेपर फुटी प्रकरण उघडकीस आले आहेत तरीही ना शिक्षण मंत्र्याचा राजीनामा झाला ना कोणाचा राजीनामा झाला. अनेक विद्यार्थ्यांनी जीवाची बाजी लावून परीक्षा पादांकृत करण्यासाठी खूप मेहनत घेतात परंतु भ्रष्ट शिक्षण मंत्री आणि भ्रष्टाचारी सत्ताधारी यंत्रणा अस्तित्वात असल्यामुळे पेपर फुटी करून जवळच्यांना जास्तीचे मार्क देऊन लायकी नसतानाही पदावर बसवण्याचे काम काही मनूवादी भडवे करत आहेत. एकीकडे आरक्षणावरून जाती-जातीत धर्माधर्मात वादविवाद लावून आरक्षणाचे वर्गीकरण हा मुद्दा समोर करून आरक्षणासाठी समाज बांधव भांडत ठेवत असलेले हे सरकार दुसरीकडे शिक्षणाचे बाजारीकरण करून गोरगरिबांना शिक्षणच मिळणार नाही अशा भूमिकेतून शासकीय शाळा बंद करत आहेत हजारो मराठी शाळा बंद केल्या आहेत आणि सीबीएससी च्या पॅटर्न खाली इंग्रजी माध्यमांच्या शाळा काढून सर्रासपणे पालकांची लूट येथे चाललेली आहे नीट पेपर फुटत आहे पैशावाल्यांच्या खिशामध्ये परीक्षा होण्या अगोदरच पेपर पडत आहेत परिणामी लायकी नसणारे लोकही प्रतिष्ठित असणाऱ्या परीक्षा पास होत आहेत. त्यामुळे येथील शिक्षण मंत्र्यांनी नैतिकता म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा भारतामध्ये वर्षानुवर्ष ब्लॅक मध्ये चालू असलेला मटका रोजच्या रोज जाहीर होतो पण मटक्या चा अंक आजपर्यंत कधीही फुटला नाही लीक झाला नाही परंतु नीट सारखे पेपर फुटत आहेत आणि हे सगळं होऊन ही येथील भ्रष्टाचारी सत्ताधारी नेते,शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेत नाही आणि संबंधित भ्रष्टाचारी यंत्रणे विषयी कोणीच काही आवाज उठवत नाही कारण सर्वच भ्रष्टाचारी असल्यामुळे तेरेभी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीचे तंत्र वापरले जात आहे परंतु अशातच अभिजीत दीपिके नामक सामान्य कुटुंबातील उच्चशिक्षित युवक समोर येतो आणि सर्व विद्यार्थ्यांचे संघटन करून 26 लाख विद्यार्थ्यांच्या वर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आणि जवळजवळ 30 विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना वाचा फोडण्यासाठी जनतेचा आवाज म्हणून समोर येऊन पेपर फुटी प्रकरणामधील दोशी असणारा शिक्षण मंत्री याचा राजीनामा मागण्यासाठी भारतातील मोठमोठ्या शहरांमध्ये आंदोलन करत असताना राजस्थान येथील जयपुर मध्ये रॅली चालू असताना त्यांच्यावरती भ्याड हल्ला होतो तेथील पोलीस यंत्रणा काय करत होती? हा हल्ला मुद्दामहून केला गेला का? या हल्ल्यामागील आरोपी कोण आहेत? ते कोणत्या संघटनेशी बांधील आहेत? हल्ला कोणी का कशामुळे केला? यामध्ये अभिजीत दीपक यांचा जीवही गेला असता आणि म्हणून या केसची सीबीआय चौकशी करून आरोपीला कठोरात कोठून शिक्षा द्यावी असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा खालापुरीकर यांनी केले आहे.


stay connected