राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न

 राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न



आष्टी (प्रतिनिधी)

राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त आष्टी तालुक्यातील धानोरा येथील जनता उच्च माध्यमिक विद्यालयात अभिवादन कार्यक्रम उत्साहात व श्रद्धापूर्वक संपन्न झाला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. ईश्वरजी शेळके, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या महान कार्याचा गौरव करत त्यांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानावर प्रकाश टाकला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले संस्कार, स्वराज्य स्थापनेत दिलेली प्रेरणा आणि त्यागमय जीवन याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा व आदर्शांचा अंगीकार करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते.

"स्वराज्याची प्रेरणाशक्ती, राष्ट्रमाता राजमाता माँ जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!"



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.