राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहिल्यानगर शहर/जिल्हा प्रभारीपदी अँड. रिजवान शेख यांची नियुक्ती Ahilyanagar News


राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अहिल्यानगर शहर / जिल्हा प्रभारीपदी अँड. रिजवान शेख यांची नियुक्ती

Rijwan Shaikh


अहिल्यानगर (प्रतिनिधी): राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अहिल्यानगर शहर व अहमदनगर जिल्हा प्रभारीपदी अँड. रिजवान कादर शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष , प्रदेशाध्यक्ष तसेच युवक प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने अँड. शेख यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

नियुक्तीनंतर अँड. रिजवान शेख यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करत ही नियुक्ती केवळ पद नसून मोठी जबाबदारी असल्याची भावना व्यक्त केली. एका सामान्य कार्यकर्त्यावर पक्षाने दाखविलेला विश्वास हा आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्याची पोहोच दर्शवणारा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी पक्षाच्या विचारधारेचा प्रसार, युवकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवण्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसची संघटना अधिक मजबूत, सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अँड. शेख यांनी आपल्या निवेदनात नव्याने नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. युवकांच्या समस्या आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तसेच पक्षाची भूमिका तळागाळातील प्रत्येक युवकापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही त्यांनी दिली.

"सत्ता ही जनतेच्या सेवेसाठी असते आणि कार्यकर्ता हा पक्षाचा खरा आधारस्तंभ असतो," या विचाराने प्रेरित होऊन युवकांना संघटित करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने काम करणार असल्याचे अँड. रिजवान शेख यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.