Tejwarta News Network 14 May 2026
म्हसोबाची वाडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
आष्टी | प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील म्हसोबाची वाडी येथे दि. १३ मे रोजी तेजवार्ता न्यूज नेटवर्क च्या वतिने व सरपंच तथा युवा नेते शिवा शेकडे यांच्या पुढाकारातून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात वृद्धेश्वर विद्यालय गहूखेल व भैरवनाथ विद्यालय आरणवीहीरा येथील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ, फेटा, प्रशस्तीपत्रक तसेच तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या ‘दिपोत्सव’ अंक देऊन गौरव करण्यात आला. गहूखेलच्या वृध्देश्वर विद्यालयात दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक घुले अमृता रामभाऊ 80.20%. , द्वितीय क्रमांक मोरे सोनाक्षी अजिनाथ 80% , तृतीय क्रमांक तेजस्विनी गोरख जगदाळे 79% , चतुर्थ क्रमांक शेकडे रोहिणी सुरेश 74.80% , पाचवा क्रमांक शेकडे अश्विनी ज्ञानदेव 74.40 % असे गुण मिळवून सुयश मिळविले तर भैरवनाथ विद्यालय अरणविहीरा च्या पल्लवी शिवरास शेकडे हिने 87% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर साईनाथ आदिनाथ तांदळे याने 86.20 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला . कल्याणी भगवान तांदळे हिने 84% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला . पूजा अंकुश शेकडे हिला 79% गुण मिळाले तिने चतुर्थ क्रमांक मिळवला . तर गोपाळ गणेश आगरकर विद्यालय टेंभू कराड च्या संकेत परमेश्वर बडे याने 91% गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला . या सर्व विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला . यावेळी तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे पत्रकार राजू गायकवाड, अशोक आडागळे, राजू शेख व अनिस मोमीन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास वृद्धेश्वर विद्यालय गहूखेलचे मुख्याध्यापक श्री. ससाने एस.आर., श्री. शेख ए.आय. सर, श्री. सय्यद वाय.ए. सर, श्री. तळेकर एस.पी. सर, श्री. आमटे बी.के. sir, श्री. मुठे एस.बी. सर, श्री. जगताप बी.डी. सर आदी उपस्थित होते.
तसेच भैरवनाथ विद्यालय आरणवीहीराचे मुख्याध्यापक शिवदास शेकडे सर, विश्वनाथ शेकडे सर, शेकडे के.बी. सर, तांदळे पी.जे. सर, आंधळे एन.एस. सर, राजगुरू बी.सी. सर, शिरसाठ डी.आर. सर, तांदळे ए.एम. सर, गव्हाणे सी.बी. सर, शेकडे एच.एम. सर, शिरसाठ टी.आर. सर, रामगुडे एस.बी. सर यांच्यासह सर्व शिक्षक व पालकांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आजिनाथ तांदळे, अंकुश शेकडे, रामनाथ घुले, भगवान तांदळे, ज्ञानदेव शेकडे, शरद गायकवाड सर, रामकिसन शेकडे सर, विष्णू शेकडे, राजू शेकडे, विलास शेकडे, रघुनाथ शेकडे, माऊली शेकडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष कृष्णा गायकवाड, विश्वजीत गायकवाड, भास्कर गर्जे, परमेश्वर शेकडे, परमेश्वर बडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सरपंच शिवा शेकडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागे परिश्रम घेणाऱ्या शिक्षक व पालकांचे आभार मानले.



stay connected