उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान प्रकरणी शिक्षणाधिकाऱ्यांना नोटीस



बीड | प्रतिनिधी

जयहिंद विद्या प्रसारक मंडळ, तांदळा ता. गेवराई जि. बीड संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद बीड यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने संबंधितांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी १५ जून २०२६ रोजी ठेवण्यात आली आहे.

संस्थेचे सचिव यांनी ॲड. यांच्या मार्फत अवमान याचिका क्रमांक २८१/२०२६ दाखल केली आहे.

साहेबराव पाटील विद्यालय, तांदळा येथील तत्कालीन कनिष्ठ लिपिक यांना सेवेतून कमी करण्याच्या आदेशाविरोधात शाळा न्यायाधिकरण, लातूर येथे अपील दाखल करण्यात आले होते. या अपिलाचा निकाल ४ फेब्रुवारी २०२५ रोजी देत न्यायाधिकरणाने संबंधित कर्मचाऱ्याला पूर्ववत सेवेत रुजू करून घेण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक यांनी या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका क्रमांक ३९३९/२०२५ दाखल केली होती. या प्रकरणाची सुनावणी २७ मार्च २०२५ रोजी झाली असता उच्च न्यायालयाने शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. ही स्थगिती अद्याप कायम असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

असे असतानाही शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी सुधाकर शेळके यांच्या अर्जावरून संस्थेला नोटीस बजावत शाळा न्यायाधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली होती. तरीदेखील १७ ऑगस्ट २०२५ रोजी संबंधित कर्मचाऱ्यास तत्काळ रुजू करून घेण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती असतानाही हेतुपुरस्सर आदेश काढून न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप करत संस्थेच्या वतीने अवमान याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेची सुनावणी ४ मे २०२६ रोजी मा. न्यायमूर्ती यांच्यासमोर झाली. यावेळी न्यायालयाने प्रतिवादी प्रियाराणी पाटील व सुधाकर शेळके यांना नोटीस बजावून पुढील सुनावणी १५ जून २०२६ रोजी निश्चित केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.