कापसी फाट्यावर मृत्यूचा भीषण साक्षात्कार ; डंपर-कारची धडक, जळून दोघाचा दुर्दैवी अंत
----------------
आष्टी तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना; ग्रामस्थांचे प्रयत्न निष्फळ
-----------------
राजेंद्र जैन / कडा
--------------
VDO पहा👇📽️
आष्टी तालुक्यातील कापसी फाटा येथे काळाने थैमान घालत भीषण अपघात घडविला. हायवा (डंपर) आणि कारची समोरासमोर झाली. या वाहनांची धडक इतकी प्रचंड होती की, कारने क्षणात पेट घेत आगीत भस्मसात झाली. या आगीत या कार मधील दोघे प्रवासी जिवंत जळून मृत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
मृतांमध्ये चालक ऋषिकेश श्रीहरी पुरी (रा. साळेगाव, ता. केज) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यांच्या सोबत एक महिला प्रवासी होती. दोघेही केज येथील रहिवासी असल्याचे समजते. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, वाहन पूर्णतः जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र आगीच्या भडक्यात सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान, घटनास्थळी अमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सपकाळ, पोलीस उपनिरीक्षक मंजुळे , पोलीस हवालदार काळे ,पोलीस नाईक भैरवाल, बिक्कड, होमगार्ड नाकाडे ,गोसीर, काळे यांच्यासह रुग्णवाहिका आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
-----%----




stay connected