पवित्र रमजान महिन्यात इंस्टाग्रामवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने गुन्हा दाखल
आष्टी प्रतिनिधी- मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यांमध्ये एका तरुणाने मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावतील असा मजकूर इंस्टाग्रामवर टाकल्याने सदरील तरुणावर अंभोरा, आष्टी पोलीस ठाण्यात तसेच कडा पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यात आली असून आपल्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती कळताच सदरील आरोपी हा फरार झाला आहे. सदरील आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी अशी मागणी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे पोलिसांना करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील डॉ अकील बशीर सय्यद हे दिनांक 2 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आपल्या हॉस्पिटलमध्ये बसून इंस्टाग्राम अकाउंट पाहत असताना ZR.TV.NEWS.09 या अकाउंटवर इराण व यु ए इ या देशाच्या युद्धजन्य परिस्थितीवरील पोस्टवर धामणगाव येथील मयूर सोपान मरकड याने _mayu_markad _ या इंस्टाग्राम अकाउंट आय डी वरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावतील असा 'अल्लाह' विषयी आक्षेपार्ह मजकूर जाणीवपूर्वक टाकून पोस्ट केली होती, या प्रकरणी डॉ अकिल सय्यद यांच्या फिर्यादीवरून मंगळवार दि. 3 मार्च रोजी अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच कडा येथे सोमवार दि. 2 मार्च रोजी रमजान नूरमोहम्मद तांबोळी यांनी ही कडा पोलीस चौकीला सदरील तरुणा विरोधात फिर्याद दिलेली दिलेली आहे. आष्टी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा सदरील आरोपीला अटक करण्यात यावे यासाठी मोठ्या प्रमाणावर तरुण एकत्र येऊन निवेदन देण्यात आले आहे. आपल्या विरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला माहिती होताच सदरील तरून हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके हे करत आहेत.



stay connected