तेजवार्ता न्यूज नेटवर्कतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न जनता विद्यालय धानोरा च्या SSC गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

 📰 तेजवार्ता न्यूज नेटवर्कतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
जनता विद्यालय धानोरा च्या SSC गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

Tejwarta


 धानोरा | प्रतिनिधी


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च 2026 च्या एसएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या जनता विद्यालय, धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवार दि. ११ मे रोजी तेजवार्ता न्यूज नेटवर्क व धानोरा ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.


यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.


या परीक्षेत कु. काव्या कुंडलीक काळे हिने 96.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. जान्हवी भगवान शिंगटे हिने 94.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. कु. दीक्षा आजिनाथ शेळके हिने 92.80 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला, तर कु. कल्याणी कैलास शेळके हिने 92.60 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला.


या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचा शाल, फेटा, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे व पालकांच्या कष्टाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


या कार्यक्रमाला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सय्यद बबलूभाई, माजी सभापती अंकुशराव चव्हाण, प्राचार्य शिवाजीराव ढोबळे, हाजी असलम सर, साहित्यिक पैलवान बाळासाहेब शेंदूरकर सर, विवेकानंद पतसंस्थेचे संचालक दादासाहेब शिंदे, संजय काळे सर, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, आजिनाथ शेळके, महादेव अडागळे, संदीप टकले, संतोष थोरवे, थोरवे सर, मोरे सर, सय्यद असलम सर, डॉ. देविदास मोरे , माजी आमदार निवृत्तीराव उगले, नागरी सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर इंगवले, कॅशियर ज्ञानेश्वर नवले तसेच पालक कुंडलीक काळे, आजिनाथ शेळके, कैलास शेळके आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात सातत्य, मेहनत आणि शिस्त यांचा अवलंब केल्यास मोठे यश सहज प्राप्त होऊ शकते, असे सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.


कार्यक्रमाचे आयोजन तेजवार्ता न्यूज नेटवर्कच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि समन्वय तेजवार्ता न्यूज रिपोर्टर सय्यद रिजवान (धानोरा, आष्टी) यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.