धामणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबिर उत्साहात संपन्न

 

📰 धामणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबिर उत्साहात संपन्न



आष्टी | प्रतिनिधी

दि. ११ मे रोजी आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे आयोजित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज महसूल शिबिर उत्साहात संपन्न झाले. या शिबिरामध्ये नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.

कार्यक्रमास तहसीलदार वैशालीताई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. तसेच एकलव्य संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष रावसाहेब पिंपळे, बीड जिल्हा उपाध्यक्ष सुभाष माळी, आष्टी तालुका अध्यक्ष शंकर बर्डे, तालुका उपाध्यक्ष हवसराव पिंपळे, आदिवासी एकता परिषद बीड जिल्हाध्यक्ष राजू माळी, टायगर फोर्सचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब माळी, एकलव्य संघटनेचे तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब माळी, बीड जिल्हा सरचिटणीस दिलीप बर्डे, दादेगावचे शिवाजी कोल्हे सर, निंबाळकर पोलीस पाटील, धामणगावचे माजी सरपंच संजय गाढवे तसेच विद्यमान सरपंच मनोज गाढवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या महसूल शिबिरामध्ये आदिवासी व मागासवर्गीय समाजातील गरजू नागरिकांसाठी रेशन कार्ड काढून देणे, आधार कार्डसाठी मदत करणे तसेच विविध शासकीय कागदपत्रांची पूर्तता करून देण्याचे काम करण्यात आले.

शिबिरास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. नागरिकांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.