*मौजे निळा येथील पानंद रस्ता व गावातील वाद सामंजस्याने मिटले*
सोनखेड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे निळा या गावात बौद्ध समाज व मराठा समाज,
मुस्लिम समाज व मराठा समाज यांच्यामध्ये पानंद रस्ता आणि मज्जतीच्या जागेच्या वापरावरून तक्रार उद्भवली होती.
सदर तक्रारीची गंभीर दखल घेऊन काल दिनांक 12 मे 2026 रोजी सपोनि माणे साहेब व वाघमारे पोलीस कर्मचारी सोनखेड यांनी मौजे निळा येथे भेट देऊन गावकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीस बालाजी गजले (सरपंच) गजानन मोरे(उपसरपंच)
पोलीस पाटील सोपानराव मोरे व तिन्ही समाजाचे प्रमुख नागरिक ग्रामस्थव तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीदरम्यान पानंद रस्ता व मज्जतीच्या जागेसंबंधी असलेल्या कायदेशीर तरतुदी व नियमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या कायदेशीर बाबी सर्व समाजबांधवांनी समजून घेतल्या व त्यावर एकमताने सहमती दर्शवली.
सध्या गावामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार अथवा तणावाचे वातावरण नाही. गावात पूर्णपणे शांतता असून कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे. पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस ठाणे सोनखेडकडून गावावर लक्ष ठेवण्यात येत आहे. व जोकुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्यावर आम्ही पुलीस प्रशासन सज्ज आहोत, कुणीही दोन समाजात वादविवाद किंवा सोशल मीडियावर भडकाऊ भाषण किंवा पोस्ट प्रसारित करू नये आसेहि सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी सांगितले
गावकऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याबद्दल व प्रशासनास सहकार्य केल्याबद्दल पोलीस प्रशासनाने सर्वांचे आभार मानले .



stay connected