📰 जनता विद्यालय धानोरा ची SSC परीक्षेत उत्तुंग भरारी
89.85 टक्के निकाल; काव्या काळे प्रथम, जान्हवी शिंगटे द्वितीय
📍 धानोरा | तेजवार्ता न्यूज प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च 2026 च्या एसएससी परीक्षेत जनता विद्यालय, धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत शाळेच्या शैक्षणिक परंपरेत मानाचा तुरा रोवला आहे. यंदा शाळेचा एकूण निकाल 89.85 टक्के लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या परीक्षेत
🥇 कुमारी काव्या कुंडलीक काळे हिने 96.20 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला.
🥈 जान्हवी भगवान शिंगटे हिने 94.20 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला.
🥉 दीक्षा आजिनाथ शेळके हिने 92.80 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला.
🏅 कल्याणी कैलास शेळके हिने 92.60 टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक प्राप्त केला.
यंदाच्या परीक्षेत शाळेतील एकूण 124 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यापैकी
✅ 52 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य,
✅ 44 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी,
✅ 27 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी,
तर
✅ 1 विद्यार्थ्याने तृतीय श्रेणी मिळवली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल भाई, सचिव कुमार आण्णा बांदल, मुख्याध्यापक शिवाजी ढोबळे सर, उपमुख्याध्यापक सय्यद आयुब सर, पर्यवेक्षक गवळी सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या या यशामुळे धानोरा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांकडूनही विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
📢 “मेहनत, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले,” अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.



stay connected