साक्षी कांबळेची दहावीत घवघवीत कामगिरी; 93 टक्के गुणांसह उज्वल यश

 

🎓 साक्षी कांबळेची दहावीत घवघवीत कामगिरी; 93 टक्के गुणांसह उज्वल यश



📍 नांदेड | चंद्रकांत वाघमारे, प्रतिनिधी

कुसुम ताई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनी साक्षी पिराजी कांबळे हिने एसएससी दहावी बोर्ड परीक्षेत 93 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

साक्षीच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांनी तिचे विशेष कौतुक केले. नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपल्या यशाचे श्रेय साक्षीने आई-वडील, गुरुजन आणि शाळेतील योग्य मार्गदर्शनाला दिले. भविष्यात डॉक्टर बनून समाजसेवा करण्याचे स्वप्न असल्याचे तिने सांगितले.

साक्षीच्या या यशाबद्दल अनेक ठिकाणी तिचा सत्कार करण्यात येत असून, तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.