Cockroch Janta Party ची वेबसाईट बंद? Abhijit Dipke यांचा सरकारवर गंभीर आरोप
बीड | प्रतिनिधी
सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप करत आपल्या अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे पक्षाची वेबसाईट बंद करण्यात आल्याचा दावा केला आहे.
दिपके यांनी केलेल्या पोस्टमध्ये, “सरकारने आमची प्रसिद्ध वेबसाईट बंद केली आहे. आमच्या वेबसाईटवर १० लाख सदस्य नोंदणीकृत होते. तसेच केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर ६ लाख सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या,” असा दावा करण्यात आला आहे.
यासोबतच त्यांनी सरकारवर हुकूमशाही पद्धतीने आवाज दाबण्याचा आरोप करत, “सरकार कॉकरोचांना इतकं का घाबरत आहे? आमचा एकमेव गुन्हा म्हणजे आम्ही चांगल्या भविष्याची मागणी करत होतो,” असे म्हटले आहे.
दिपके यांनी पुढे “आम्ही नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहोत. कॉकरोच कधीच मरत नाहीत,” असेही नमूद केले आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

.jpg)
stay connected