आयुष्यमान भारत योजनेद्वारे आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यात येणार -- ओमप्रकाश शेटे 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन -- सुरेश धस

 आयुष्यमान भारत योजनेद्वारे आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यात येणार 
-- ओमप्रकाश शेटे
22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन 
-- सुरेश धस

आयुष्यमान भारत योजनेद्वारे आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यात येणार  -- ओमप्रकाश शेटे 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन  -- सुरेश धस

आयुष्यमान भारत योजनेद्वारे आष्टी,पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील रुग्णांना जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यात येणार  -- ओमप्रकाश शेटे 22 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन  -- सुरेश धस


 आष्टी (प्रतिनिधी) आयुष्यमान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्य, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना याद्वारे आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील जास्तीत जास्त रुग्णांना लाभ देण्यात येणार आहे आगामी काळात किमान 25000 रुग्णांना या योजनेचा फायदा होईल असे नियोजन करण्यात येणार आहे असे प्रतिपादन डॉ.ओमप्रकाश शेटे अध्यक्ष आयुष्मान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्य यांनी केले 

आष्टी येथे आयोजित आयुष्मान भारत मिशन आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते यावेळी आ.सुरेश धस यांनी 

दि.22 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या रुग्णांवर तसेच वयोवृद्ध नागरिकांच्या गुडघेदुखी सारख्या व्याधींवर देखील उपचार करण्यात येणार आहेत असे प्रतिपादन केले आष्टी येथील आयुष्यमान भारत मिशन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते पुढे बोलताना डॉ.ओमप्रकाश शेटे  म्हणाले की,

 विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या बीड जिल्ह्यामध्ये 01एप्रिल 20 20 पासून लागू असून दिनांक 28 जुलै 20 ते 20 पासून पांढऱ्या रंगाच्या शिधापत्रिका शासकीय न्यू शासकीय कर्मचारी यासह सर्व शिधापत्रिका धारा कुटुंबांचा समावेश करण्यात आला आहे तसेच कोणत्याही प्रकारची शिधापत्रिका नसलेले कुटुंबे यांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे 23 फेब्रुवारी 20 26 पासून सर्व अंगीकृत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे या योजनेमध्ये उपचाराची खर्च मर्यादा पाच लक्ष रुपये असून प्रतिक कुटुंब पृथ्वी वर्ष तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपये प्रति कुटुंब प्रति वर्ष अशी तरतूद करण्यात आली असून त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट लागू नाही रुग्ण नोंदणी पासून ते उपचार पूर्ण होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पारदर्शक आणि ऑनलाईन जलद उपचार मंजुरी प्रक्रिया करण्यात येणार आहे तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेअंतर्गत यापूर्वी 1356 व्याधींवरील रुग्णांना अर्थसहाय्य मंजूर होत असे त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषत्वाने प्रयत्न करून 2399 व्याधींचा समावेश या योजने मध्ये करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या 1792 वरून 4537 एवढी वाढली असून आता ही सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे ऋण नोंदणी पासून पूर्ण होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण डिजिटल पारदर्शक आणि ऑनलाईन असून रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणाली द्वारे करण्यात येत आहे त्यामध्ये हृदय फुफ्फुस यकृत प्रत्यारोपणासारख्या आजारांसाठी आता 22.00 लाख रु.पर्यंत उपचार सहाय्य करण्यात येत असून 70 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना अधिकचे 5.00 लक्ष रुपये विमा कवच मंजूर करण्यात आले आहे एक जुलै 20 24 पासून शासकीय 18 खाजगी 47 असे 65 रुग्णालय तसेच 62 प्राथमिक आरोग्य केंद्र या योजनेमध्ये अंगीकृत करण्यात आले आहेत आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी शिधापत्रिकांची अडचण होत आहे त्यासाठी तीनही तहसीलदारांनी यामध्ये लक्ष घालून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आष्टी पाटोदा शिरूर कासार तालुक्यातील 25 हजार रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यात यावा असे काम करण्याची आवश्यकता असलेली सांगत त्यांनी आष्टी तालुक्यातील मोठ्या प्रमाणावरील रुग्ण अहिल्यानगर येथील अनेक विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेतात त्यामुळे अहिल्यानगर येथील आयुष्मान भारत मिशन अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या सर्व रुग्णांची काळजी घ्यावी त्यांना योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होऊ नये यासाठी अहिल्यानगर येथे विशेष बैठक घेऊन खाजगी रुग्णालयातील प्रमुखांना त्याबाबत सूचना करण्यात येतील असे सांगत ज्यादा पैसे आकारणाऱ्या हॉस्पिटलला दंड आकारण्यात येईल बीड येथील काही रुग्णालयांना दहा लाख रुपयांचा दंड करण्यात आला असेही त्यांनी शेवटी सांगितले यावेळी आ.सुरेश धस यांनी आष्टी पाटोदा आणि शिरूर (कासार )तालुक्यातील तहसीलदारांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी शिधापत्रिकांची किंवा प्रमाणपत्र देऊन जास्तीत जास्त लाभधारकांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी सर्व यंत्रणा सतर्क करावी असे सांगत जामखेड येथील काही रुग्णालयांमध्ये अवास्तव ज्यादा स्वरूपामध्ये शुल्क आकारण्यात येते त्याची चौकशी करण्यात यावी असे सांगत आगामी 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस असल्याने त्यानिमित्ताने आष्टी विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये मुंबई येथील अनेक व्याधींवरील उपचार करण्यासाठी विशेषतज्ञ डॉक्टरांना प्राचारण करण्यात येणार असल्याचे सांगितले आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी काही प्रमुख कार्यकर्त्यांना मुंबई येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आष्टी तालुक्यातील गावांची संख्या आणि अपघात ग्रस्त रुग्णांची संख्या पाहता आष्टी येथे आणखी एक 108 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल असेही आश्वासन त्यांनी शेवटी दिले..

 या आढावा बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय कदम  अहिल्यानगर येथील जिल्हास्तरीय सदस्य अमित घाडगे महाराज तहसीलदार आष्टी श्रीमती वैशाली पाटील नगराध्यक्ष जिया बेग सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे आष्टी विधानसभा अध्यक्ष गणेश शिंदे माऊली जरांगे बद्रीनाथ जगताप, आयुष्यमान भारत योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर गायकवाड तसेच डॉक्टर शिवशंकर वलांडे डॉक्टर वसीम शेख तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश तांदळे आष्टी ग्रामीण वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रामदास मोराळे पाटोदा गटविकास अधिकारी उद्धव सानप आष्टी गट विकास अधिकारी गोकुळ बागलाने हे उपस्थित होते



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.