पाटोद्यात पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची धावपळ; प्रशासन मात्र बेफिकीर!

*पाटोद्यात पेट्रोल-डिझेलसाठी नागरिकांची धावपळ; प्रशासन मात्र बेफिकीर!* 



पाटोदा (प्रतिनिधी ) पाटोदा शहरात पेट्रोल व डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. इंधनासाठी वाहनधारकांना एका पंपावरून दुसऱ्या पंपावर धावपळ करावी लागत असून, तरीही अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर "नो स्टॉक"चे फलक झळकत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही ठिकाणी इंधन उपलब्ध होताच मोठ्या रांगा लागत असून, त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाया जात आहे. रोजंदारी करणारे, शेतकरी, व्यावसायिक तसेच आपत्कालीन सेवांसाठी वाहनांचा वापर करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.दरम्यान, या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वेळेवर इंधन पुरवठा न झाल्याने जनतेत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.नागरिकांनी आमदार, खासदार तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.