*स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था.. राज्यस्तरीय सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन करिता.. कथालेखक बाळासाहेब देशमुख निमंत्रित*

 *स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था.. राज्यस्तरीय सहावे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन करिता.. कथालेखक बाळासाहेब देशमुख निमंत्रित*



अहिल्यानगर:- स्व पै किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व पै. नाना डोंगरे व्यायाम शाळा,निमगाव वाघा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित.. श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती, श्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती, श्री तुकडोजी महाराज जयंती निमित्त.. राज्यस्तरीय ०६वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन, निमगाव वाघा येथे 17 मे 2026 रोजी संपन्न होत आहे. साहित्य संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक प्रतिभा खैरनार यांची निवड झालेली आहे. 

साहित्य संमेलन आयोजक माननीय नाना डोंगरे यांनी पत्र पाठवून, कथालेखक श्री बाळासाहेब देशमुख यांना कथाकथन कार्यक्रमाकरिता निमंत्रित केलेले आहे.

कथालेखक बाळासाहेब देशमुख, कथाकथन कार्यक्रमात 'अबोली' ही कथा सांगणार आहेत. चिकित्सा, जिज्ञासा असणारी नातवंडे, आणि त्यांना अभ्यासपूर्ण ओजस्वी उत्तर देणारे आजी आजोबा ,यांची जुगलबंदी म्हणजे 'अबोली' कथा होय. नातवंडांच्या शंका कुशंका, प्रश्नांनी आजी-आजोबांची त्रेधा तिरपीट उडत रहाते.

बाळासाहेब देशमुख यांचे आजवर अहिल्यानगर जिल्ह्यात 500 प्रयोग पूर्ण झालेले आहेत. शिवाय विविध आकाशवाणी केंद्रावर 120 कथा प्रसारित झालेल्या आहेत. राज्यस्तरीय साहित्य संमेलन मध्ये त्यांचे आजवर २८ कथाकथन प्रयोग पूर्ण झालेले आहेत..

त्यांच्या या निवडीबद्दल ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत पालवे, बाबुराव उपाध्ये ,दिलीप कापसे, रूपचंद शिदोरे , सुरेखा घोलप यांनी अभिनंदन केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.